जुलै महिन्यात 'या' राशीतील लोकांवर धोक्याची टांगती तलवार
Astrology : जुलै महिन्यात या राशीतील लोकांना धोका पत्करावा लागणार असल्याचं भाकीत जोतिषशास्त्रानं सांगितलं आहे.
ADVERTISEMENT

1/4
वैदिक जोतिषशास्त्रने दिलेल्या माहितीनुसार, सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती आहे. या युतीमुळे 1 जुलैपासून अंगारक योग निर्माण झाला आहे. हा अंगारक योग 28 जुलैपर्यतं असणार आहे. या काळात सिंह, वृश्चिक आणि मकर राशीतील लोकांच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. या राशीतील लोकांच्या व्यवसायात तसेच नातेसंबंधात समस्या होण्याची शक्यता असल्याचे जोतिषशास्त्राचं म्हणणं आहे.

2/4
सिंह राशी
सिंह राशीतील लोकांसाठी पहिल्या घरात हा योग निर्माण होणार आहे. यामुळे स्वभावात चिडचिडेपणा आणि क्रोध वाढेल. त्यामुळे सिंह राशीतील लोकांनी रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच जोडीदारासोबत तणावाची परिस्थिती निर्माण होईल.

3/4
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीतील लोकांसाठी कर्मभावात हा योग तयार होईल. कामाच्या ठिकाणी सहकऱ्यांशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे प्रतिमा खराब होईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. गर्भवती महिलांना आपली काळजी घ्यावी.

4/4
मकर राशी
मकर राशीतील लोकांचा हा योग आठव्या घरात तयार होईल. जुने आजार पुन्हा उद्भवू शकतील, आर्थिक नुकसान आणि रक्तदाबाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.