मुंबईची खबर: 'सिंदूर' पुलाच्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा! लवकरच 'या' मार्गावरून वाहतूक सुरू....

दक्षिण मुंबईतील पूर्व –पश्चिम भागांना जोडणा-या या उड्डाणपुलाचे लोकार्पण 10 जुलै 2025, गुरुवारी करण्यात येणार आहे. मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

'सिंदूर'  पुलाच्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा! लवकरच 'या' मार्गावरून वाहतूक सुरू....

'सिंदूर' पुलाच्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा! लवकरच 'या' मार्गावरून वाहतूक सुरू....

मुंबई तक

• 11:01 AM • 09 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिंदूर उड्डाणपुल लवकरच वाहतूकीसाठी सुरू...

point

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Mumbai News: मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला आणि पी. डिमेलो मार्गाला जोडणारा उड्डाणपुल कर्नाक नावाने ओळखला जात होता. आता या उड्डाणपुलाचे नामकरण सिंदूर असे करण्यात आले असून लवकरच या पुलावरून नागरिकांसाठी वाहतूक सुरू होणार आहे. दक्षिण मुंबईतील पूर्व –पश्चिम भागांना जोडणा-या या उड्डाणपुलाचे लोकार्पण 10 जुलै 2025, गुरुवारी करण्यात येणार आहे. मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री श्री. अजितदादा पवार, विधानसभा अध्‍यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांची उपस्थिती राहणार आहे. 

हे वाचलं का?

विविध मान्यवरांची उपस्थिती

गुरुवारी सकाळी 10 वाजता या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार असून विविध मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती असणार आहे. यामध्ये राज्‍याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा तसेच स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, आमदार श्री. सुनिल शिंदे, आमदार श्री. राजहंस सिंह, महानगरपालिकाआयुक्त आणि प्रशासक श्री. भूषण गगराणी यांचा समावेश असणार आहे. 

ऑपरेशन 'सिंदूर'ला समर्पित 

भारताने पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला समर्पित करत या उड्डाणपुलाचे नाव 'सिंदूर' ठेवण्यात आलं आहे. लवकरच हा पूल वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍या नेतृत्‍वाखाली पूल विभागाचे अभियंते यांनी सिंदूर उड्डाणपुलाची उभारणी 10 जून 2025 रोजी पूर्ण करण्‍यात आली आहे. दक्षिण मुंबईतील पूर्व – पश्चिम भागांना जोडणा-या या पुलावरून दोन्‍ही दिशेने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्‍ध होणार आहे.

हे ही वाचा: आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिंदे गटाच्या आमदाराने घातला राडा, कॅन्टीन व्यवस्थापकाला केली मारहाण

150 जुना उड्डाणपूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा उड्डाणपूल 150 जुना असल्यामुळे ऑगस्ट 2022 मध्ये मध्य रेल्वेकडून तो पाडण्यात आला होता. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मध्य रेल्वेच्या मंजूर आराखड्यानुसार नव्या पुलाची पुनर्बांधणी केली.

BMC ने दिलेल्या माहितीप्रमाणे, सिंदूर पुलाची एकूण लांबी 328 मीटर आहे. यामध्ये रेल्वे क्षेत्रातील 70 मीटर आणि महानगरपालिका क्षेत्रातील 230 मीटर अप्रोच रोडचा समावेश आहे. त्यात 550 मेट्रिक टन वजनाचे, 70 मीटर लांबीचे, 26.5 मीटर रुंदीचे आणि 10.8 मीटर उंचीचे दोन मोठे स्टील गर्डर बसवण्यात आले आहेत.

या पुलाशी संबंधित सर्व टेक्निकल प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती BMC ने दिली. स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र, सुरक्षा प्रमाणपत्र आणि रेल्वेचे ना हरकत प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे. दोन्ही बाजूंचे अ‍ॅप्रोच रोड, सिग्नलिंग, रंगकाम, अपघातविरोधी अडथळे अशी सर्व कामे देखील पूर्ण करण्यात आली आहेत. 

हे ही वाचा: MNS-Shivsena UBT: 'मीडियाशी अजिबात बोलायचं नाही..', थेट आदेश, राज ठाकरेंच्या मनात चाललंय तरी काय?

'सिंदूर' उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये 

1. मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डि' मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव ह्या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व - पश्चिमेला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे.
2. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर पी डि' मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग या जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 
3. पुलाच्या पुर्नबांधणीसाठी सुमारे 10 वर्षे या मार्गावरील बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. 
4. पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार आहे. 
 

    follow whatsapp