Maharashtra Weather : राज्यातील हवामान विभगाने 9 जुलै रोजीच्या हवमानाचा अंदाज वर्तवला आहे. भारतातील हवमान विभागाच्या(IMD)च्या अंदाजानुसार मान्सूनची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यामध्ये उत्तर-पश्चिम, मध्य आणि भारताच्या पूर्वेकडील भागातील मान्सूनची प्रगती चांगली आहे. याचाच परिणाम हा राज्याच्या मान्सूनवर दिसून येणार आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा हवमान विभागाचा अंदाज आहे. याची महत्त्वाची अपडेट पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, तरुणीला शिक्षिकेनंच केलं होतं मार्गदर्शन, खोट्या तक्रारीसाठी...
कोकणात पावसाचा हाय अलर्ट
कोकणातील रायगड, रत्नागिरीत पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तसेच मुंबईत काही अंशी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. यामुळे काही भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाने समुद्रकिनारी फिरू नये असं सांगितलं.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार मान्सूनची शक्यता आहे. तर पुण्यात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीसह कोल्हापूरात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अपेक्षित पाऊस कोसळेल. तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
विदर्भ
विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सून असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
हेही वाचा : तुमच्याही काळाजाचा थरकाप उडेल.. दीड महिन्याचा मुलाला आईने उकळत्या पाण्यात उकळून काढलं!
पावसाची शक्यता पाहता, हवमान विभागाने कोकण भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने तयारी ठेवावी. तसेच समुद्रकिनारी जाताना काळजी घ्यावी.
ADVERTISEMENT
