Mumbai Shocking Viral News : मुंबईत एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. एका 32 वर्षांच्या चार्टर्ड अकाऊंटने ब्लॅकमेलिंगच्या नैराश्यात जीवन संपवलं. राज लीला मोरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मोरेनं टोकाचं पाऊल उचलण्याआधी तीन पानं सुसाईड नोट लिहिली. त्याने दावा केला आहे की, दोन तरुणा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याच्या धमक्या देऊन त्याला ब्लॅकमेल करायचे. या प्रकरणी त्याला 3 कोटींचा फटका बसला होता. त्यामुळे नैराश्यात असलेल्या सीएनं स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT
व्हिडीओत नेमकं काय होतं?
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, राज लीला मोरेनं विष पिऊन आत्महत्या केली. एका नोटमध्ये त्याने लिहिलं की, राहुल परवानी आणि सबा कुरैशी नावाचे दोन व्यक्ती प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची त्याला धमकी द्यायचे. या व्हिडीओत नेमकं काय होतं, हे आतापर्यंत समजलं नाही. मागील 18 महिन्यात मोरेला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून कोट्यावधी रुपये उकळले, असं बोललं जात आहे. ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणांना मोरेच्या गुंतवणुकीबाबत आणि आर्थिक स्थितीबाबत माहित होतं, असा दावा केला जात आहे. अशातच त्यांनी मोरे यांच्या कंपनीच्या खात्यातील मोठी रक्कम त्यांच्या खात्यात वळवली.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? रेल्वे विभागाचा मोठा निर्णय...
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु, आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाहीय. या तरुणांनी मोरेची लक्झरी कारही हिसकावून घेतल्याचं समोर आलं आहे. मोरेच्या आईने पोलिसांना सांगितलं की, त्यांचा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होता.
मोरेनं नोटमध्ये लिहिलं, माझ्या आईची माफी मागतो. कुटुंबियांनी स्वत:ची काळजी घ्यावी. तसच मोरेनं त्याचे सहकारी दीपा लखानीबाबत म्हटलं, आज माझ्याकडे माफी मागण्यासाठी शब्द नाहीत. कारण मी तुमचा विश्वास तोडला आहे. पण हे शेवटचं होतं. माझा तुमचा विश्वास तोडण्याचा कोणताच हेतू नव्हता. मी जे काही केलं, ते स्वत:च केलं. कोणालाही काही माहित नव्हतं. मी खात्यात कोणताती खोटा व्यवहार केला नाही. श्वेता आणि जयप्रकाशला अजिबात माहित नव्हतं की, काय होत आहे. कृपया त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नका.
हे ही वाचा >> PUNE: 'डिजे लावणाऱ्या गणेश मंडळांना आर्थिक मदत करणार नाही', पुनीत बालन यांची मोठी घोषणा
ADVERTISEMENT
