Relationship Tips: जोडीदार निवडताना ‘ही’ चूक करतात 99 टक्के जण, अरेंज मॅरेजवाल्यांनी तर…

मुंबई तक

• 10:25 AM • 22 Nov 2023

अरेंज मॅरेज करताना अनेक अडचणी येत असल्या तरी काही समस्या निर्माण होतातच. मात्र त्याकडे आपण जर जाणीवपूर्वक लक्ष दिले, त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला तर मात्र अरेंज मॅरेजही शंभर टक्के यशस्वी ठरु शकतात. मात्र एका चुकीमुळेही कधी कधी पश्चात्ताप करण्याची वेळ येते.

Dont make these mistakes about your life partner during arranged marriage

Dont make these mistakes about your life partner during arranged marriage

follow google news

Arrange marriage: सध्याच्या काळात लग्न करण्याच्या अनेक पद्धती आल्या असल्या तरी काही लग्न पद्धती या कुटुंबीयांच्या मर्जीनुसारच केल्या जातात. त्यामुळे अरेंज मॅरेज करताना एकमेकांचा जीवनसाथीदार म्हणून निवड करायची असली तरी त्यामध्ये कुटुंबीयांचा सहभाग महत्वाचा मानला जातो. अरेंज मॅरेजमध्ये (Arrange marriage) तुमचा जीवनसाथदार (Life Partner) निवडणे हे खूप अवघड काम आहे. कारण त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर पडत असतो. कारण अरेंज मॅरेज करत असताना मुलगा आणि मुलगी यांच्यापेक्षा कुटुंबाचाच (Family) त्यामध्ये सहभाग अधिक असतो. भारतात मुलापेक्षा मुलगी कुटुंबीयांना कशी आवडते याची उत्सुकता अधिक असते. या सगळ्या गोष्टीनंतर मुलगा किंवा मुलगी यांच्या आवडीनिवडीचा विचार केला जातो.

हे वाचलं का?

नेमक्या चुका कोणत्या

अरेंज मॅरेजमध्ये तुम्हाला एक योग्य जोडीदार भेटला तर क्षणात तुमचं आयुष्य बदलून जात असते, आणि तेच तुमच्यासाठी खरं आनंददायी असते. मात्र अनेकदा अरेंज मॅरेजमुळे लोकांचे आयुष्यात अनेक समस्या येत असतात. मात्र अरेंज मॅरेज करताना असंही काही जणांच्या लक्षात आले की, जीवनसाथीदार निवडताना काही लोकं काही चुका करताना दिसून येतात. तर अरेंज मॅरेज करताना लोकं नेमक्या कोणता चुका करतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कौंटुबिक पार्श्वभूमीला महत्व

अरेंज मॅरेजमध्ये लोकं अनेकदा कौटुंबिक पार्श्वभूमीला प्राधान्य देत असतात. मात्र त्याच वेळी जीवनसाथीदाराची सामाजिक स्थिती आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बघणेही अधिक महत्वाचे असते. परंतु आपण भावनिक आणि लाईफस्टाईलच्या नादात त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे भविष्यात वैवाहिक आयुष्यात अनेक समस्या येतात.

तुमचे प्राधान्य ओळखा

विवाह करताना अनेक वेळा कौटुंबिक दबावामुळे लोकं त्यांच्या महत्वपूर्ण आणि प्राधान्यक्रमाने महत्वाच्या असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये तुमचा जीवनसाथीदार निवडण्याआधी तुम्ही तुमच्या कुटुंबियांना तुमच्या प्राधान्याक्रमाबद्दल आणि इच्छा-आकांक्षाबद्दल अगोदरच स्पष्ट करणे गरजेचे असते.

हे ही वाचा >> वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी, दोघा तरुणांनी केली आत्महत्या

घाईघाईने निर्णय घेणे

काही वेळा लोकं एकमेकांना समजून न घेताच कोणताही निर्णय घाईघाईने घेतात. अरेंज मॅरेज करताना ते नातेसंबंध तयार होण्याआधीच घरच्याकडून किंवा बाहेरच्या लोकांकडून मुलावर किंवा मुलीवर दबाव आणला जातो. त्यामुळे तुम्हाला जर अरेंज मॅरेज यशस्वी करायचे असेल तर तुम्ही एकमेकांबद्दल चांगल्या गोष्टी जाणून घेणे आणि त्यावर बोलणे महत्वाचे आहे.

बोलत नाही

अरेंज मॅरेज करताना अनेकदा असंही दिसून येते की, दोन कुटुंबं मिळून मुलगा आणि मुलगी यांचे नाते ठरवत असतात. ज्या दोघांना आयुष्यभर एकमेकांसोबत राहायचे असते त्या दोघांमध्येच कुटुंबीयांच्या आधी संवाद होत नाही. त्यातच दोन्हीकडील कुटुंबं लग्नाआधी मुलगा आणि मुलगी या दोघांना एकमेकांशी बोलूही दिले जात नाही. किंवा अरेंज मॅरेजमध्ये कधी कधी ज्यांना एकमेकांशी लग्न करायचे आहे त्यांना त्यांच्या इच्छेनुसार बोलताही येत नाही. मात्र अरेंज मॅरेजमध्ये या गोष्टी झाल्या नाही तर मात्र भविष्यात त्याचे तोटे तुम्हाला सहन करावे लागत असता. त्यामळे तुमचं नातं अधिक मजबूत करायचे असेल तर मात्र तुम्ही एकमेकांना वेळ देणं, एकमेकांशी बोलणं हे फार महत्वाचे आहे.

स्वत:हून निर्णय न घेणे

अनेकदा लग्न करताना असे दिसून येतं की मुलगा किंवा मुलगी त्यांच्या नातेसंबंधाबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे त्यांच्या कुटुंबाला देत असतात. त्यामुळे भविष्यात कधी नातेसंबंधात काही अडचणी निर्माण झाले तर मात्र ते सगळा दोष त्यांच्या कुटुंबाला देत असतात. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतील तर आणि अरेंज मॅरेज यशस्वी करायचे असेल तर त्या सर्व निर्णयप्रक्रियेत भाग घेणे महत्वाचे असते.

    follow whatsapp