Numerology : नवऱ्याचा गेमच बदलून टाकतात 'या' मुली, विषयच हार्ड!

मुंबई तक

• 05:06 PM • 11 Nov 2024

Numerology Astrology : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह, नक्षत्र, राशी आणि अंक यांचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे. हे सर्व वेगवेगळ्या विज्ञानांशी संबंधित आहेत.

MumbaiTak
Google CTA

Numerology Astrology : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह, नक्षत्र, राशी आणि अंक यांचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे. हे सर्व वेगवेगळ्या विज्ञानांशी संबंधित आहेत. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवन आणि भविष्याविषयी सांगितलं जातं. राशीचक्र आणि ग्रह पाहून आपण जन्मकुंडली, जीवन आणि भविष्य वर्तवू शकतो. त्याचवेळी जन्मतारखांच्या आधारे आपण आपल्या जीवनाबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकतो. (numerology astrology radix girls of these 3 radix are lucky for their husbands they open the closed doors of luck)

हे वाचलं का?

अंकशास्त्राला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. यामध्ये जन्मतारखेपासून मिळालेल्या आकड्यांच्या आधारे जीवन आणि व्यक्तिमत्त्व मोजले जाते. या संख्यांना मूलांक आणि भाग्यांक म्हणतात, जे ग्रहांशी संबंधित आहेत. आज आपण काही खास मूलांकांच्या मुलींबद्दल जाणून घेऊयात ज्या पतीसाठी खूप भाग्यशाली मानल्या जातात.

मूलांक 1 (Radix 1)

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 ते 28 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक हा 1 असतो. जेव्हा तुम्ही या तारखांची बेरीज कराल तेव्हा तुम्हाला 1 हाच मूलांक मिळेल. 1 हा मूलांक क्रमांक जीवनात ग्रहांची ऊर्जा सुख, समृद्धी आणि सौभाग्य आणतो.

सूर्याची कृपा

मूलांक 1 हा सूर्य ग्रहाशी संबंधित आहे, जो जीवन आणि उर्जेचा घटक आहे. ही संख्या आत्मविश्वास, यश आणि नेतृत्व यांचे प्रतीक आहे. या मूलांकाच्या मुली नेहमी ऊर्जा आणि आत्मविश्वासू असतात.

'या' मुली पतीसाठी असतात भाग्यशाली

1 मूलांक क्रमांच्या मुली ज्या कोणाशी लग्न करतात त्यांचे आयुष्य बदलून टाकतात. त्या त्यांच्या पतीच्या आयुष्यात ऊर्जा आणि यश आणतात.

मूलांक क्रमांक 5 (Radix 5)

कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. हा आकडा खूप लकी मानला जातो.

मूलांक 5 हा बुध ग्रहाशी संबंधित आहे. हा संवाद, बुद्धिमत्ता आणि यशाचा घटक मानला जातो. या मूलांकाच्या मुली आपल्या पतीची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे काम करतात. खरं तर, बुद्धाचा आशीर्वाद त्यांच्यावर राहतो, ज्यामुळे ते आपल्या पतीचे उत्पन्न देखील वाढवतात.

मूलांक क्रमांक 6 (Radix 6)

महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 6 असतो. 6 क्रमांकाच्या लोकांच्या जीवनावर शुक्राचा प्रभाव असतो. शुक्र माणसाच्या जीवनात सुख, समृद्धी, सौभाग्य, ऐश्वर्य, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा आणते. या मुली आपल्या पतीचे आयुष्य प्रेमाने भरतात. त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते.