Relationship Tips : नवऱ्याने बायकोसमोर रडणे योग्य की अयोग्य?

प्रशांत गोमाणे

• 12:06 PM • 23 Nov 2023

पत्नीचा विषय आला तर त्याला एक पार्टनर आणि कुटुंबप्रमुख म्हणून स्वत:ला कमकुवत दाखवायचं नसत. पण खरंच पुरूषांनी बायकोसमोर रडणे योग्य आहे का? चला जाणून घेऊयात.

relationship tips men cry in front of wives what research says

relationship tips men cry in front of wives what research says

follow google news

”मर्द को दर्द नही होता”…”मर्द रोते नही है”…असे एकापेक्षा एक डायलॉग सिनेमात पडले आहेत. तसेच मर्दानगी दाखवण्यासाठी हिरोंना रफ अँड टफ दाखवण्यात आले. पण पुरूष (Men) इमोशनल होत असल्याचे क्वचितच दृष्य आहेत. ही राहिली पडद्यावरची गोष्ट. रियल लाईफमध्ये देखील तेच घडते. पुरुषांना त्यांचे इमोशन जाहीर करण्याचे खुपच कमी स्वातंत्र्य आहे. त्यात जर पत्नीचा (Wives) विषय आला तर त्याला एक पार्टनर आणि कुटुंबप्रमुख म्हणून स्वत:ला कमकुवत दाखवायचं नसत. पण खरंच पुरूषांनी बायकोसमोर रडणे योग्य आहे का? चला जाणून घेऊयात. (relationship tips men cry in front of wives what research says)

हे वाचलं का?

खरं तर पुरुषांना लहानपणापासूनच तुम्ही मर्द आहात, तुम्ही रडलं नाही पाहिजे, तुम्ही तुमच्या भावना जाहिर केल्या नाही पाहिजेत असे संस्कार दिले जातात अथवा ते मनावर बिंबवले जाते. त्यामुळे पुरुषांमध्ये आपसूकच आपल्या भावना जाहिर न करण्याची सवय जडून जाते. पण जरी पुरुषांवर असे संस्कार होत असले तरी, सर्वात जास्त कर्न्फटेबल तो त्याच्या जोडीदारा सोबतच होतो.

‘इतके’ टक्के पुरुष रडणे टाळतात

एका अभ्यासातून अशी गोष्ट समोर आली आहे की 73 टक्के पुरुषांनी हे मान्य केले आहे की ते त्याच्या जोडीदारासमोर रडण्यास संकोच करत नाही. तर केवळ 8% लोकांनी ते त्यांच्या जोडीदारासमोर कधीही रडणार नाही, असे सांगितले आहे.

हे ही वाचा : Exclusive: मुख्यमंत्र्यांनी ‘ती’ चूक केली? छगन भुजबळ म्हणाले, ‘ते’ माझे बॉस..

…म्हणून रडत नाही

पुरुष इतर पुरुषांसमोर कमी रडतात, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना स्वतःला एकमेकांसमोर अधिक मर्दपणा दाखवायचा असतो. तर पत्नी किंवा मैत्रिणीसमोर अशा भावना कमी असतात. याशिवाय, त्यांना हे देखील चांगले समजते की स्त्रिया भावना समजून घेण्यास अधिक सक्षम असतात.

महिलांनी काय करावे?

जर पती रडत असेल आणि तो कमकुवत आहे अशी भावना न ठेवता त्याला भावनिक आधार दिला तर त्याला त्या समस्येतून बाहेर येण्यास खुप मदत मिळते. यामुळे, रडण्याचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि ते त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकतात. हे त्यांना नकारात्मक विचारांपासून देखील वाचवते.

हे ही वाचा : एक दोन नव्हे तर तब्बल 57 वेळा भोसकलं, जीव जाईपर्यंत थांबला नाही

एका अभ्यासानुसार पुरुषांचे रडणे अधिक गंभीर असल्याचे महिलांनी मान्य केले होते. कारण पुरुष त्यांच्या भावना व्यक्त करण्यात कचरतात ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर एखादी गोष्ट त्यांना रडायला भाग पाडत असेल तर याचा अर्थ ते खरोखरच खूप गंभीर आहे.

त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्हाला भावनिक होऊन रडावेसे वाटले तर बायकोसमोर न डगमगता रडा. कारण तीही तुला समजून घेते. अशा अवस्थेत नाते देखील घट्ट होते.

    follow whatsapp