मुंबई Tak जय हिंद उत्सव: 'म्हणून भारताने पाकसोबत शस्त्रसंधी केली, पण...' माजी लष्करप्रमुखांनी स्पष्टच सांगितलं!

भारताने पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी करण्याचं नेमकं काय कारण होतं? याबाबत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी नेमक्या शब्दात उत्तर दिलं आहे. जाणून घ्या ते नेमकं काय म्हणाले.

मुंबई Tak जय हिंद उत्सवमध्ये मनोज नरवणेंनी दिली मोठी माहिती

मुंबई Tak जय हिंद उत्सवमध्ये मनोज नरवणेंनी दिली मोठी माहिती

मुंबई तक

• 12:01 AM • 24 May 2025

follow google news

पुणे: भारताने पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी का केली याबाबत नेमकं उत्तर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी दिलं आहे. मुंबई Tak जय हिंद उत्सव या विशेष कार्यक्रमात मनोज नरवणे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. Tak चॅनल्सचे मॅनेजिंग एडिटर आणि मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. ज्या दरम्यान, माजी लष्करप्रमुखांना ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीबाबत काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले.

हे वाचलं का?

भारताला पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी करण्याची गरज का पडली? पाहा माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे नेमकं काय म्हणाले

प्रश्न: जेव्हा आपण पाकिस्तानला उत्तर दिलं आणि अचानक शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली तर लोकांची अशी भावना होती की, आपण माघार घेतली. जर आपण पुढे जात होतो तर अचानक आपण थांबलो.. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? हे का झालं.. आपल्याला अशी काय गरज होती की आपण शस्त्रसंधी करायला गेलो?

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे: जेव्हा एखादी अॅक्शन घेतली जाते तेव्हा त्यामागे एखादा उद्देश असतो. एक राजकीय उद्देश असतो आणि एक लष्करी उद्देश असतो. तर जी काही कारवाई आपण केली ती करण्याआधी नक्कीच ठरवलं असेल की, त्यामागे आपलं लष्करी लक्ष्य काय आहे आणि काय मेसेज आपण देणार आहोत. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपण जे काही हल्ले चढवले आणि त्यानंतर पाकिस्तानकडून काही हल्ले करण्यात आले. ज्याला आपण पुन्हा प्रत्यु्त्तर दिलं. या सगळ्यामागे काही लक्ष्य होतं, उद्देश होता.. जर का हा उद्देश साध्य झाला आहे तर मग थांबायला पाहिजे.. नाहीतर सुरू ठेवा, सुरू ठेवा असं नाही होत. जर उद्देश साध्य झालाय तर योग्य वेळी थांबणं हे बरोबर होतं.

असं म्हणत मनोज नरवणे यांनी शस्त्रसंधीचा निर्णय कसा योग्य होता यामागचं कारण स्पष्ट केलं. 

दरम्यान, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचं असंही म्हणणं आहे की, आता केवळ शस्त्रसंधी केलेली आहे. ऑपरेशन सिंदूर हे काही थांबविण्यात आलेलं नाही. तर ते तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. कारण पाकिस्तान काय करेल याचा काही भरवसा नाही. अशावेळी जर पुन्हा एकदा पाकिस्तानने काही आगळीक केली. तर त्याला तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडून दिलं जाईल.

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची मुंबई Tak जय हिंद उत्सवातील संपूर्ण मुलाखत

    follow whatsapp