पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं मोदी सरकारला पत्र, लसीकरणाबाबत केली अत्यंत महत्त्वाची मागणी

मुंबई तक

• 04:07 PM • 07 Dec 2021

देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. मुंबईतही कोरोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला एक पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून या मागण्या केल्या आहेत. हे पत्र आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर अकाऊंटवर शेअर केलं आहे. […]

Mumbaitak
follow google news

देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. मुंबईतही कोरोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला एक पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून या मागण्या केल्या आहेत. हे पत्र आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर अकाऊंटवर शेअर केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?

आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात दोन मागण्या केल्या आहेत. यात लसीकरणासाठी किमान वयोमर्यादा 15 केली पाहिजे. ज्यामुळे महाविद्यालयीन आणि माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांना लस देता येईल. तसंच आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिसरा डोस देण्यात यावा म्हणजेच बुस्टर डोस देण्यात यावा अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली आहे.

देशात ओमिक्रॉनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात दोन गोष्टी सुचवू इच्छितो असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत चर्चा केली. या चर्चेनंतर वाटतं की लसीकरणाची मर्यादा 18 ऐवजी 15 करण्यात यावी. असा निर्णय घेतला गेला तर महाविद्यालयात जाणारी मुलं आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुलांना कवच पुरवता येईल. कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस देण्याबाबत संमतीही मागण्यात आली आहे.

लसींच्या दोन डोसमधली अंतर चार आठवड्यांचं केलं तर जानेवारी 2022 पर्यंत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांना लसीचे दोन डोस देण्याचं उद्दीष्ट पूर्ण होईल. सध्या मुंबईत 73 टक्के लोकांना लसींचे दोन डोस देण्यात आले आहेत असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबईत सोमवारी ओमिक्रॉनची बाधा झालेले दोन रुग्ण आढळले होते. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधितांची संख्या 10 इतकी झाली आहे. सुदैवाने आज दिवसभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा एकही रूग्ण आढळलेला नाही. राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेही क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 34 प्रयोगशाळा नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. तसेच लसीकरण पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी याबाबत स्थानिक आरोग्य विभागास कळवावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

    follow whatsapp