Crime news : उत्तर प्रदेशातील झाशीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पतीचं नाव दलचंद अहिरवार असे आहे. तसेच आरोपी पत्नीचं नाव जानकी असे आहे. त्या दोघांनाही दोन मुलं असून त्यांचे कुटुंब हरियाणातील बहादूरपगड येथे राहत होता. संबंध प्रकरणात पत्नीचे घरमालकाशी प्रेमसंबंध झाल्याचा पतीचा आरोप आहे. या प्रकरणात दलचंदला मारहाण करण्यात आली. तेव्हा त्याचा फोनही हिसकावला आणि नंतर पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रायगड हादरलं! पोटच्या लेकरांनीच 'त्या' एका कारणासाठी आईवडिलांची केली हत्या, मृतदेह दोन दिवस कुजलेल्या अवस्थेत खोलीत
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात मृताच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक महिन्यापूर्वी दालचंद रडत फरिदाबादला आला आणि त्याने सांगितलं की, तिचे घरमालकाशी प्रेमसंबंध आहेत. विनोदने आरोप केला की, जेव्हा त्याने विरोध दर्शवला असता, दालचंद यांनी त्यांच्या पत्नीच्या प्रियकराला बेदम मारहाण केली आणि नंतर फोनही काढून घेण्यात आला.
या प्रकरणात पुढे विनोद म्हणाला की, ती तिच्या माहेरी निघून गेली, त्यानंतर दालचंद घरी परतला. त्याची पत्नी जानकीने दालचंदने खरेदी केलेली जमीन विक्रीस काढण्यात आली होती, तेव्हा दोघांमध्ये वाद उफळला गेला आणि अशा स्थितीत त्याच्या कुटुंबाने तिला पाठिंबा दिला. याचमुळे दालचंदने टोकाचं पाऊल उचललं.
पतीने बायकोच्या त्रासाला कंटाळून व्हिडिओ कॉलवर आत्महत्या केली
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाने विष प्राशन करत 2 मिनिटांचा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओत पत्नी जाणकीला उद्देशून म्हणतोय की, माझ्यासारख्यांचा कोणाचाही विश्वासघात करू नकोस. मला मरायचेच आहे, जर तु माझ्याशी एकदा तरी बोलली असतीस तर मी मेलो नसतो.
दरम्यान, मृतकाचा भाऊ चंद्रभानने आरोप केला की, 29 ऑक्टोबर रोजी सासरच्या घरी गेला असता, त्याला मारहाण करण्यात आली. नंतर शिवीगाळही करण्यात आली. 31 ऑक्टोबर रोजी तो पुन्हा घरी परतला. तेव्हा त्याच्या जेवणात विष कालवून जेवण दिले. मृत दलचंद्रचा मेहुणा नंदकिशोर याने सांगितलं की, दलचंद्र दारू प्यायल्यानंतर हाणामारी करायचा आणि यामुळे वादंग व्हायचा.
हे ही वाचा : 10 वर्षाची चिमुकली विहिरीवर धुवत होती कपडे, दोघांनी तिला इमारतीत उचलून नेलं , नंतर तोंडात बोळा कोंबून आळीपाळीने...
संबंधित प्रकरणात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविजच्छेदनासाठी पाठवला आणि व्हिडिओबाबतची कसलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितलं. तक्रारीनंतर पोलीस पुढील तपास करत आहे.
ADVERTISEMENT











