मोठा बँक घोटाळा! ABG Shipyard ने 28 बँकांना 22,842 कोटींना फसवल्याचा आरोप; गुन्हा दाखल

मुंबई तक

• 05:02 PM • 12 Feb 2022

28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे (ABG Shipyard Ltd) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय स्टेट बँक अर्थात एसीबीआयच्या नेतृत्वाखाली 28 बँकांच्या कन्सॉर्टियमसोबत 22,842 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. एबीजी शिपयार्डचे संचालक […]

Mumbaitak
follow google news

28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे (ABG Shipyard Ltd) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय स्टेट बँक अर्थात एसीबीआयच्या नेतृत्वाखाली 28 बँकांच्या कन्सॉर्टियमसोबत 22,842 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

हे वाचलं का?

एबीजी शिपयार्डचे संचालक अग्रवाल यांच्यासह सीबीआयने तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार, अग्रवाल आणि रवी विमल नेवेतिया आणि एबीजी इंटरनॅशनल प्रा. लि. (ABG Internationl Pvt Ltd) या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हेगारी कट रचने, फसवणूक, विश्वासघात आणि पदाचा दुरूपयोग केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेने 8 नोव्हेंबर 2019 रोजी पहिल्यांदा तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सीबीआयने 12 मार्च 2020 पर्यंत स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर बँकेने त्याच वर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा नव्याने तक्रार दाखल केली. जवळपास दीड वर्ष सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर तक्रारीवरून 7 फेब्रुवारी 2022 रोजी गुन्हा दाखल केला.

कंपनीने 28 बँका आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थाकडून कर्ज घेतलं. त्याचबरोबर एसबीआयचे 2,468.51 कोटी रुपये एक्सपोजर आहे. फॉरेन्सिग ऑडिटमध्ये हा प्रकार समोर आला आहे. 2012 ते 2017 या काळात आरोपींनी आपसात संगनमत करून निधी दुसरीकडे वळवला. त्याचबरोबर अनियमितता आणि फसवणूक केली.

बँकांनी ज्या उद्देशांसाठी निधी दिला होता, त्याऐवजी दुसऱ्याच कामासाठी हा पैसा वापरण्यात आला, असं तक्रारीत म्हटलं आहे.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही खासगी क्षेत्रातील जहाज बांधणी करणारी कंपनी आहे. ही कंपनी भारतात व्यावसायिक आणि सरकारी ग्राहकांना सेवा देते. या कंपनीचे जहाज बांधणीचं काम गुजरातमधील दहेज आणि सुरतमध्ये चालतं.

    follow whatsapp