Andheri bypoll : निवडणूक आयोगाकडे नोटाच्या प्रचाराची तक्रार, भाजपचा उल्लेख करत अनिल परबांचा गौप्यस्फोट

मुंबई तक

• 10:43 AM • 01 Nov 2022

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतल्यानंतरही ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सोपा नसल्याचं सातत्यानं बोललं जातंय. याला कारण दिलंय जातंय ते अंधेरी विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या नोटाचा प्रचार. काही कथित ऑडिओ क्लिप्सही समोर आल्या होत्या. पण, आता ठाकरे गटाने थेट निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केलीये. ठाकरे गटाने नोटाचा प्रचार करणाऱ्यांच्या क्लिप्सही निवडणूक आयोग आणि पोलिसांना दिल्यात. […]

Mumbaitak
follow google news

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतल्यानंतरही ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सोपा नसल्याचं सातत्यानं बोललं जातंय. याला कारण दिलंय जातंय ते अंधेरी विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या नोटाचा प्रचार. काही कथित ऑडिओ क्लिप्सही समोर आल्या होत्या. पण, आता ठाकरे गटाने थेट निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केलीये. ठाकरे गटाने नोटाचा प्रचार करणाऱ्यांच्या क्लिप्सही निवडणूक आयोग आणि पोलिसांना दिल्यात. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माहिती दिलीये.

हे वाचलं का?

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि अनिल परब यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी नोटाच्या प्रचाराबद्दल माहिती दिलीये.

नोटाचा प्रचार सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर परब म्हणाले, “आमच्याकडे जी माहिती आलेली आहे. त्यात असं कळतंय की काही लोकांना पैसे देऊन ‘नोटा’ची बटण दाबण्यासाठी लोकांना नोटा दिल्या जात आहेत. नोटा आणण्याचं कारण असं आहे की, नोटाचा वापर कमी व्हावा. प्रत्यक्षात नोटांचा वापर कमी व्हावा. नोटांचा वापर ‘नोटा’साठी केला जात असल्याची माहिती आम्हाला दररोज मिळतेय.”

अनिल परब पुढे म्हणाले, “यासंदर्भात मी निवडणूक आयोगात आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. ज्या भागातून ही माहिती मिळतेय, त्या भागांची नावं आम्ही पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला दिली आहेत”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

“आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन केलंय की, नोटा हा त्या माणसाचा अधिकार असतो. हा काही प्रचाराचा भाग नसतो. एखाद्या व्यक्तीला कोणताही उमेदवार योग्य वाटला नाही, तर त्यानं नोटाचं बटण दाबयचं असतं. हा त्याचा मूलभुत अधिकार असतो. त्याचा प्रचार करता येत नाही. अशा प्रकारे प्रचार करणाऱ्या क्लिप्स आमच्या हाती लागल्या आहेत. त्या क्लिप्स आम्ही निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. मला खात्री आहे की, निवडणूक आयोग यावर तातडीनं कारवाई करेल. त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही केलीये”, असंही अनिल परब यावेळी म्हणाले.

अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाचा प्रचार : अनिल परबांनी भाजपला केलं आवाहन

अनिल परब म्हणाले, “मी जे व्हिडीओ बघितलेत, त्यात आरपीआयचे पदाधिकारी उघडपणे हा प्रचार करताहेत. त्याच्या क्लिप्स आमच्याकडे आल्या आहेत. आरपीआय भाजपच्या सोबत असलेला पक्ष आहे. त्या पक्षाचं समर्थन भाजपला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की एका बाजूने सहानुभूती, सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राचा इतिहास या गोष्टींचा आदर राखून त्यांनी उमेदवार मागे घेतला पण दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने नोटाचं बटण दाबून निषेध व्यक्त करा. हा निषेध ज्या पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली, त्यांचा आहे. अशा क्लिप्स आम्हाला मिळाल्या आहेत. त्यांचं अंतर्गत भांडण त्यांनी या निवडणुकीत आणू नये. त्यांचा विषय त्यांनी आपसात मिटवावा”, असं अनिल परब म्हणालेत.

    follow whatsapp