विक्रम गोखले हे विचारवंत आहेत, विचार करूनच बोलले असतील-अवधूत गुप्ते

विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याने ते वादात सापडले आहेत. अशात त्यांनी जो कंगनाला पाठिंबा दिला त्यासंदर्भात आज ते सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहेत. आज सकाळी 11 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे. विक्रम गोखलेंनी केलेल्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तर अभिनेता अतुल […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:50 AM • 17 Nov 2021

follow google news

विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याने ते वादात सापडले आहेत. अशात त्यांनी जो कंगनाला पाठिंबा दिला त्यासंदर्भात आज ते सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहेत. आज सकाळी 11 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे. विक्रम गोखलेंनी केलेल्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तर अभिनेता अतुल कुलकर्णीने एका ओळीचं ट्विट केलं आहे ज्याचा संबंध थेट विक्रम गोखलेंशी जोडला जातो आहे. अशात संगीतकार, गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी विक्रम गोखलेंच्या म्हणणं योग्य असल्याचं नमूद केलं आहे. अवधूत गुप्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

Vikram Gokhale : विक्रम गोखलेंना काय झालंय…? कंगना रनौतचं केलं समर्थन

काय म्हणाले अवधूत गुप्ते?

‘विक्रम गोखले मोठे कलाकार आहेत. ते केवळ कलाकार म्हणून मर्यादित नाहीत. विक्रमजी विचारवंत आहेत. त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. ते आमच्या वडिलांच्या स्थानी आहेत. आम्ही त्यांचा खूप आदर करतो. विक्रमजी जे काही बोलले असतील ते विचार करूनच बोलले असतील. त्यांनी व्यक्त केलेले मत पूर्ण विचारांती असावं. त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी पात्रता नाही.’ असं अवधूत गुप्तेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं अवधूत गुप्तेंनी टाळलं.

‘समाजात विकृत मनोवृत्ती असते, तिची दखल घ्यायची नाही’; शरद पवारांचा विक्रम गोखलेंना टोला

शरद पवारांनी काय म्हटलं होतं विक्रम गोखलेंच्या प्रतिक्रियेवर?

शरद पवार म्हणाले होते, ‘ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलत आहात, अशांच्या अशा वक्तव्यांची नोंद सुद्धा घ्यावी असं मला वाटतं नाही. त्याची नोंद आपण घेऊ नये. शेवटी समाजात असे काही लोक असतात. शेवटी समाजात ज्याला इंग्रजीमध्ये पव्हर्ट (pervert) म्हणतात अशी एक मनोवृत्ती असते. म्हणून त्याची आपण दखल घ्यायची नसते. सोडून द्यायचं असतं’, असं म्हणत शरद पवार यांनी विक्रम गोखलेंवर निशाणा साधला होता.

काय आहे प्रकरण?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी जे मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं, तर भीक होती. भारत २०१४ मध्ये स्वतंत्र झाला’, या अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या विधानावरून वाद सुरू असतानाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं आहे. ‘कंगना जे बोलली ते खरंय, तिच्या मताशी मी सहमत आहे’, असं अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं.

नेमकं काय म्हणाले होते विक्रम गोखले?

कंगना रनौत जे म्हणाली आहे की, जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते भीक मागून मिळालेलं आहे. त्यावर मी सहमत आहे. हे दिलेलं आहे बरं का? हे ज्या योद्धयांनी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना फासावर जाताना. मोठंमोठे लोक बघत राहिले, त्यांना वाचविले नाही.”

“आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहत आहेत. हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही. असेही काही लोक आपल्या केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे”, अशी भूमिका मांडत विक्रम गोखले यांनी कंगना रनौतच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

    follow whatsapp