केंद्रीय अर्थमंत्री आज संसदेत ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, लॉकडाऊन काळात सामान्य नोकरदारांनी गमावलेली नोकरी, कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन या पार्श्वभूमीवर सितारामन सर्वसामान्यांसाठी यंदा काय सवलती देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अर्थसंकल्प सादर करण्याची सितारामन यांची तिसरी वेळ असणार आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी हा अर्थसंकल्प मदत करेल असंही ठाकूर म्हणाले. नरेंद्र मोदी सरकारच्या सबका साथ, सबका विकास आणि आत्मनिर्भर भारत या दोन उद्दीष्टांना डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचंही ठाकूर म्हणाले. घरातून निघण्याआधी ठाकूर यांनी पुजाही केली.
काय असू शकतं आजच्या अर्थसंकल्पात??
१) कोरोना महामारी आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद
२) आरोग्यसेवेसाठी खर्च वाढवण्याकरता सामान करदात्यांवर अधिभार लादला जाऊ शकतो.
३) महामारीच्या काळात नोकरी गमावलेल्या नोकरदार वर्गाला करसवलत मिळण्याची अपेक्षा
४) भारत-चीन सीमेवरील संघर्ष पाहता संरक्षण क्षेत्रातही भरीव तरतूदीची अपेक्षा
ADVERTISEMENT
