Crime News : लग्न झाल्यानंतर दोनच महिन्यात एका बायकोने आपल्या नवऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवऱ्याचा खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव बायकोने रचला. मात्र पोलिस तपासात तिचा सगळा खेळ उघडकीस आला. नवऱ्याची गळा दाबून तिने हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह रोशनदानला लटकवला. तिचे हे नाटक अखेर उघडकीस आले. पण तिने हे टोकाचे पाऊल का उचलले? जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'साहेब, बायकोच्या प्रेमप्रकरणांना कंटाळलोय...' नवऱ्याची पोलिसांकडे धाव, बायकोविषयी काय केली तक्रार?
दोनच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
उत्तरप्रदेशातील बरेली येथील जितेंद्र यादव आणि ज्योती यांचे दोनच महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांचे आठ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. जितेंद्र इंडियन व्हेटर्नरी रिसर्च सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने कामावर होता. मात्र लग्नानंतर दोनच महिन्यात ज्योतीने आपल्या आठ वर्षांच्या प्रेमाचा गळा घोटला. ज्योतीने तिच्या नवऱ्याचा गळा दाबून खून केला आणि त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. त्याचा खून करुन मृतदेह घरातील रोशनदानला लटकवला. यावेळी त्याची जीभ बाहेर आली होती. सुरुवातीला पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे मानले होते. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्टनंतर सगळे प्रकरण समोर आले.
...म्हणून नवऱ्याला संपवले
पोलिसांनी ज्योतीची चौकशी केली असता खून करण्यामागील धक्कादायक कारणाचा उलगडा झाला. जितेंद्रला ऑनलाईन गेमिंगचं खूप वेड होतं. याला ज्योती वैतागली होती. यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्याच्या या नादाला कंटाळून ज्योतीने नवऱ्याला संपवले. यामध्ये तिच्या कुटुंबियांनीही तिला साथ दिल्याचं समोर आलं आहे. ज्योतीचे कॉस डिटेल्स तपासले असता. घटनेवेळी तिने तिच्या कुटुंबियांना फोन केल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा : अल्पवयीन तरुणांचा 6 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार... आरोपीच्या आईने स्वतःच्या मुलासोबत पाहा केलं तरी काय
कुटुंबाचा ज्योतीवर वेगळाच आरोप
जितेंद्रच्या कुटुंबियांनी मात्र ज्योतीवर वेगळेच आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांनुसार, लग्नापासूनच ज्योती जितेंद्रवर त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता विकून शहरात तिच्या नावावर घर आणि चारचाकी गाडी खरेदी करण्यासाठी आग्रह करत होती. त्याने याला नकार दिल्याने ज्योती आणि तिच्या कुटुंबियांनी जितेंद्रच्या संपूर्ण कुटुंबाला हुंड्यासाठी छळाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. दरम्यान, ज्योती आणि तिच्या कुटुंबाला अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 108, 351 आणि 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT











