Crime News: केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात एका तरुणीच्या मृत्यूची नोंद आत्महत्या म्हणून करण्यात आली होती. पण जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतसं कथेला पूर्णपणे वेगळं वळण मिळालं. तपासादरम्यान, हे प्रकरण पूर्वनियोजित हत्या असल्याचं निष्पन्न झाले आणि तीन दिवसांतच या प्रकरणा उलगडा झाला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
ही घटना 24 जानेवारी रोजी घडली आणि मंगळवारी एका 36 वर्षीय आरोपीच्या अटकेनंतर धक्कादायक बाब उघडकीस आली. आरोपी पुरुष हा मृत महिलेचा जवळचा नातेवाईक असून त्याने तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केले. पीटीआयच्या वृत्तानुसार, 26 वर्षीय पीडित तरुणी एलाथूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील औद्योगिक युनिटमध्ये गंभीर अवस्थेत आढळली. शनिवारी महिलेला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती आणि काही वेळानंतर तिचा मृत्यू झाला. पीडिता फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा आरोपीने सुरूवातीला केला.
आरोपी वैशाखने पोलिसांना सांगितलं की त्याने महिलेला फाशीवर लटकलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्याच्या पत्नीच्या मदतीने तिला रुग्णालयात नेलं. त्याने ते आत्महत्या असल्याचं भासवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण पोलिसांना त्याच्या जबाबात विरोधाभास जाणवू लागले आणि तपासात धक्कादायक गोष्टी उलगडत गेल्या. तपासात असं दिसून आलं की पीडितेचे आरोपीसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, आरोपीला आता तिच्यापासून सुटका हवी होती. त्यामुळे, त्याने सुसाइड पॅक्टचं आमिष दाखवून मुलीला युनिटमध्ये नेले. त्याने तिला आश्वासन दिलं की जर ते एकत्र राहू शकत नसतील तर ते एकत्र आत्महत्या करतील. आरोपीने आधीच दोन फास तयार केले होते जेणेकरून पीडितेला संशय येणार नाही.
हे ही वाचा: बलात्काराच्या आरोपात आधीच तुरुंगात, पॅरोलवर सुटल्यानंतर देखील मोलकरणीच्या मुलीला सोडलं नाही अन् पत्नीच्या मैत्रिणीसोबत सुद्धा...
मृतदेहावर सुद्धा लैंगिक अत्याचार
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने फासात डोकं ठेवताच, आरोपीने तिच्या पायाखालची खुर्ची लाथ मारून बाजूला केली. महिलेला सावरण्याची संधीच मिळाली नाही. खरं तर, ही पूर्णपणे पूर्वनियोजित हत्या होती. आरोपी तिथेच उभा होता आणि त्याच्या डोळ्यासमोर पीडिता वेदनेने तडफडत असल्याचं पाहत होता. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. फॉरेन्सिक रिपोर्ट्सनुसार, त्या पीडितेचा मृतदेह खाली उतरवल्यानंतरही तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या खुलाशामुळे प्रकरण आणखी भयानक झालं.
आरोपीची पुढची योजना रात्री परत येऊन युनिटची सीसीटीव्ही हार्ड डिस्क नष्ट करण्याची होती. तो पुरावे मिटवून कायमचा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पण पोलिसांना त्याच्या जबाबात काहीतरी संशयास्पद आढळलं. नंतर, पोलिसांनी युनिट सील केलं आणि डिजिटल पुरावे सुरक्षित केले. सखोल चौकशीत, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने कबूल केलं की त्याचे पीडितेसोबत अनैतिक संबंध होते आणि ती महिला त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती. त्यामुळे, त्याने तिच्या हत्येचा कट रचला.
ADVERTISEMENT











