इंस्टाग्रामवर मुलीसोबत वाद; तिचा प्रियकर संतापला आणि क्लासला जाताना विद्यार्थ्याचं अपहरण करून हत्या...

क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलाचं अपहरण करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित तरुणाच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, इंस्टाग्रामवर त्याचं एका मुलीसोबत भांडण झालं होतं आणि त्याच वादातून त्या मुलीच्या प्रियकराने त्याची निर्दयी हत्या केली.

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:01 PM • 31 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंस्टाग्रामवर तरुणाचा मुलीसोबत वाद

point

तिचा प्रियकर संतापला आणि क्लासला जाताना विद्यार्थ्याचं अपहरण करून हत्या...

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News: क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलाचं अपहरण करून नंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित तरुणाच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, इंस्टाग्रामवर त्याचं एका मुलीसोबत भांडण झालं होतं आणि त्याच वादातून त्या मुलीच्या प्रियकराने त्याची निर्दयी हत्या केली. त्यानंतर, पोलिसांनी रेल्वे अंडरपासच्या जवळ असलेला मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सध्या, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

संबंधित घटना ही बिहारच्या आरा येथील नवादा पोलीस स्टेशन हद्दीत केजी रोडवर घडली. हत्येनंतर, मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील पिपरहिया रेल्वे अंडरपासखालील पाण्यातून मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. बडहरा येथील एकवना गावाची रहिवासी असलेला 18 वर्षीय सन्नी कुमार सिंह अशी मृत तरुणाची ओळख समोर आली असून तो सध्या नगर पोलीस स्टेशन हद्दीतीस धनुपरा येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. 

अपहरण आणि निर्घृण हत्या... 

मृत तरुण हा इंटरमिजिएटचा विद्यार्थी होता आणि तो धनुपरा येथील त्याच्या घरातून एका मित्रासोबत क्लाससाठी निघाला होता. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, सन्नीने त्याच्या चुलत भावाला फोन करून तो काही लोकांसोबत असल्याचं त्याने सांगितले होतं. यानंतर त्याने त्याच्या सख्ख्या भावाला फोन करून सांगितलं की काही तरुण त्याला बळजबरीने बाईकवर बसवून गडहनीच्या दिशेने घेऊन जात आहेत, त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. त्यानंतर, त्याचा मोबाईल बंद झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबात गोंधळ उडाला. पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी नवादा पोलीस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, सत्य घटना उघडकीस आली. 

हे ही वाचा: बीड: बनावट नोटांचे केज कनेक्शन! चक्क माजी सरपंच अडकला तामिळनाडूतील बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये...

इंस्टाग्रामवर झालेल्या वादातून भयंकर घटना 

पोलिसांच्या तपासातून समोर आलं की, इंस्टाग्रामवर झालेल्या वादानंतर ही हत्या करण्यात आली. खरं तर, मृत तरुणाचं इंस्टाग्राम अकाउंटवर एका मुलीसोबत वाद झाला होता आणि त्या वादातून संबंधित मुलीच्या प्रियकराने त्याच्या मित्रांसोबत मिळून पीडित तरुणाचं अपहरण केलं, नंतर, त्याला बेदम मारहाण केली आणि गळा दाबून त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच, मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. लवकरच, या प्रकरणाचा खुलासा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

    follow whatsapp