Transgender Cheated : तृतीयपंथीयांकडे समाजाच्या बघण्याचा दृष्टिकोनात अजूनही फारसा बदल झालेला नाही. त्यांना मिळणारी वागणूक, त्यांच्यावरील अन्याय हे आपण बघत, ऐकत असतो. मात्र हे प्रकरण काहीसं वेगळं आहे. एका तरुणाने तृतीयपंथीय व्यक्तीसोबत लग्न केलं. यानंतर दोघं एकत्र राहू लागले. पण अचानक एक दिवस सगळंच बाहेर आलं. पीडित तृतीयपंथी व्यक्ती सानिया उर्फ सनी याने आरोप केला आहे की, लग्न केलेल्या तरुणाने तिला गंडवलं आहे. घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन तो तरुण पसार झाला आहे आणि लवकरच परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे. उत्तरप्रदेशातील लखनऊमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड : मोबाईल अन् दारुसाठी पैशांचा वाद, नातवाने आजोबाला संपवलं; अन् नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला
सानियाला दिला धोका
पीडित तृतीयपंथी व्यक्ती सानिया उर्फ सनी मारुफ नावाच्या तरुणासोबत राहत होती. मारुफने तिच्यासोबत लग्न केलं होतं. तो सानियाला रोज स्कुटीवरुन कामावरदेखील सोडत असे. मात्र 21 जानेवारीला सकाळी 9 वाजता सानियाला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्या व्यक्तीने सांगितलं की, मारुफने दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न केलं आहे आणि तो लवकरच परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. याचा सानियाला धक्का बसला. दुपारी एक वाजता ती कामावरुन घरी आली. तेव्हा तिला अजून एक धक्का बसला. घरात असलेल्या तिजोरीतील सोन्याची चेन, मंगळसूत्र, कर्णफुलं, 250 ग्रॅम चांदी आणि जवळपास 2 लाख रुपयांची रोख रक्कम गायब होती.
सानिया उर्फ सनीचा आरोप काय आहे?
सानियाने आरोप केला आहे की, याआधीही 7 ऑक्टोबर 2025 रोजी मारुफ घरातील सामान घेऊन पसार झाला होता. त्यावेळी सानियाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हा मारुफने माफी मागितली होती आणि पुन्हा एकदा तो सोबत राहू लागला होता. मात्र यावेळी त्याने पूर्ण प्लॅनिंग करुन चोरी केली. यामध्ये त्याचे कुटुंबियदेखील सामील असल्याचा आरोप सानियाने केला आहे.
हे ही वाचा : जवळच्या नातेवाईकांकडून तरुणीच्या मृतदेहासोबत लैंगिक संबंध, हादरवून टाकणारं प्रकरण
कुटुंबियही आहेत सामील
सानियाने मारुफचे वडील इश्तियाक अहमद, आई नुसरत, भाऊ आणि बहिणीवर आरोप केले आहेत. सानियाचं म्हणणं आहे की, मारुफचे कुटुंबिय त्याच्याविषयी काही माहिती द्यायला तयार नाहीत. उलट ते तिला शिव्या देऊन तिचा अपमान करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT











