अल्पवयीन तरुणांचा 6 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार... आरोपीच्या आईने स्वतःच्या मुलासोबत पाहा केलं तरी काय

एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, पीडितेची अवस्था पाहून एका आरोपीच्या आईने स्वतः तिच्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

6 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार...

6 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार...

मुंबई तक

• 08:00 AM • 01 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन तरुणांचा 6 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार...

point

आरोपीच्या आईने स्वतः मुलाला केलं पोलिसांच्या स्वाधीन!

Crime News: दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 13, 14 आणि 15 वर्षांच्या अल्पवयीन तरुणांनी एका सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. ते म्हणाले की, मुलीच्या कुटुंबीयांनी 18 जानेवारी रोजी ही प्रकरणाची तक्रार नोंदवली होती आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध तातडीने कारवाई केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पीडितेची अवस्था पाहून एका आरोपीच्या आईने स्वतः तिच्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

हे वाचलं का?

पोलिसांनी या घटनेबाबत सांगितलं की, प्रकरणाची माहिती मिळताच महिलेने तिच्या मुलीला ताबडतोब पोलिस ठाण्यात आणलं आणि तिथून तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. तक्रारदार महिलेने सांगितलं की, तिन्ही आरोपी मुलांनी तिच्या मुलीला इमारतीच्या छतावर नेलं आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 

आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन आरोपी एकाच कारखान्यात काम करतात. तक्रारीच्या आधारे, आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की, अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करण्यात आलं आहे. आता, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून सहा वर्षांच्या मुलीला मेडिकल तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: धक्कादायक! 'पत्नीच्या गर्भपाताला आई जबाबदार...' रागाच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच संपवलं

पीडितेच्या आईने दिली तक्रार 

मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकल तपासणीनंतर त्यांच्या जबाब सुद्धा नोंदवला गेला आहे. पीडितेच्या आईने तक्रारीत सांगितलं की, आपली मुलगी अतिशय गंभीर अवस्थेत घरी परतली होती. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, ती घरी परतली तेव्हा ती रक्ताने माखलेल्या अवस्थेत होती. त्यावेळी तिच्या विचारपूस केल्यानंतर, ती पडली असल्याने तिला लागल्याचं पीडितेने सांगितलं. मात्र, तिच्या शरीरावरील जखमांच्या खुणांवरून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा अंदाज येत होता. त्यानंतर, तिला पुन्हा याबाबत विचारल्यानंतर, तिने तिच्यासोबत घडलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितलं. 

    follow whatsapp