Crime News : प्रेमात वेडे झालेले लोक काय करतील याचा नेम नाही. बऱ्याचदा या वेडापायी खून, आत्महत्या असे प्रकार घडतात. मात्र एका इंजिनीअरने भलताच प्रकार केल्याचे समोर आले आहे. एका मुलीसोबत त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होती. मात्र कुंडली न जुळल्याने हे लग्न मोडण्यात आले. यामुळे संतप्त होऊन त्या इंजिनिअरने मुलीचे नग्न्नावस्थेतील फोटो पोस्टाने तिच्या नातेवाईकांना पाठवले. इतकंच नाही तर हे फोटो त्याने गल्लीतील भिंतींवर चिकटवले. ही खळबळजनक घटना आहे मध्यप्रदेशातील इंदोरमधील. धक्कादायक म्हणजे, अपराधाच्या आयडिया त्याला क्राईम पेट्रोल बघून सुचल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी इंदोर क्राइम ब्रँचने इंजिनीअरला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भाच्याच्या प्रेमात मामी आकंठ बुडाली! पतीची निर्दयी हत्या अन् मृतदेहासमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध...
कुंडली न जुळल्याने संताप
पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीचं नाव आयुष अग्निहोत्री असून एका खाजगी कंपनीत तो डेटा अॅनालिस्ट म्हणून काम करतो. आयुषची पीडितेसोबत एका मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख झाली होती. या दोन्ही कुटुंबांमध्ये त्यांच्या लग्नाची बोलणी सुरु झाली होती, मात्र कुंडली न जुळल्याने बोलणी थांबवण्यात आली. यामुळे नाराज होऊन आयुषने पीडिता आणि तिच्या परिवाराला त्रास देण्यास सुरुवात केली.
क्राईम पेट्रोल बघून सुचली कल्पना
हादरवून टाकणारी बाब म्हणजे अपराध करण्याच्या पद्धती आयुषने क्राईम पेट्रोल बघून शिकल्या. आपली ओळख लपवण्यासाठी तो मास्क आणि टोपी घालून उज्जैन, देवास आणि धार अशा शहरांमध्ये जाऊन पीडितेचे आक्षेपार्ह फोटो असणारी पत्रं पाठवत असे. जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत त्याने हा प्रकार सुरु ठेवला. एवढ्यावरच न थांबता तो कुटुंबाला अॅसिड हल्ल्याच्या धमक्याही देत असे.
हे ही वाचा : Govt Job: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! काय आहे पात्रता? अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू...
स्थानिक पोलिसांना अपयश, क्राइम ब्रँचने मुसक्या आवळल्या
स्थानिक पोलिसांना याचा तपास न करता आल्याने केस क्राइम ब्रँचकडे देण्यात आली. क्राइम ब्रँचने जवळपास २५ दिवस तपास करुन आयुषच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT











