Crime News: 12 वीत शिकणाऱ्या एका तरुणीची निर्दयी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडितेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, आरोपीने तिच्या हाताची बोटे आणि नाक कापल्याचं मृतदेहावरून दिसून आलं. तसेच, तिचा गळा चिरून आणि डोक्यावर दगडाने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. विद्यार्थीनीवर झालेल्या या क्रूरतेमुळे स्थानिकांमध्ये संताप आणि भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पीडितेचा भयानक अवस्थेत मृतदेह पाहिल्यानंतर लोकांनी ताबडतोब पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आता, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
संबंधित प्रकरण उत्तराखंडच्या डेहराडून येथील विकासनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ढालीपूर शक्ती कालव्याजवळून जाणाऱ्यांनी कालव्याच्या काठावर रक्ताने माखलेल्या एका मुलीचा मृतदेह पाहिला. मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं पाहून स्थानिकांना मोठा धक्का बसला. लोकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. प्रकरणाची माहिती मिळताच विकासनगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
हे ही वाचा: इंस्टाग्रामवर मुलीसोबत वाद; तिचा प्रियकर संतापला आणि क्लासला जाताना विद्यार्थ्याचं अपहरण करून हत्या...
चुलत भावासोबत घराबाहेर पडली अन्...
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर तपास सुरू केला. त्यांना तिथे एक बाईक आणि कोयता सापडला. त्यामुळे हाच कोयता मुलीची हत्या करण्यासाठी वापरण्यात आल्याचा पोलिसांना संशय आला. मुलीच्या हाताची बोटे कापण्यात आली होती आणि तिच्या नाकाचा काही भाग दिसत नव्हता. तिचा गळाही निर्दयीपणे चिरला गेला होता. इतकेच नव्हे तर, तिचं डोकं दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली होती. पीडिता बुधवारी संध्याकाळच्या सुमारास तिच्या चुलत भावासोबत बाईकवरून ओषधे घेण्यासाठी गेली होती. मात्र, रात्री बराच वेळ घरी परतली नसल्याने कुटुंबियांना तिची चिंता वाटू लागली. अगदी सकाळपर्यंत कुटुंबातील सदस्य त्या दोघांचा शोध घेत होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी स्थानिकांना कालव्याच्या शेजारी पीडितेचा मृतदेह आढळला.
हे ही वाचा: हिंगोली : 69 वर्षीय वृद्धाचा 9 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार! पीडितेला चॉकलेट खायला दिलं अन्...
तरुणीचा मृतदेह सापडला पण तिचा चुलत भाऊ बेपत्ता असल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांच्या तपासादरम्यान, एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये पीडिता तिच्या चुलत भावासोबत बाईकवरून जाताना दिसली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भावाने एका दुकानातून कोयता खरेदी केला होता आणि त्याने त्या कोयत्याने तरुणीची हत्या केली. पोलिसांना या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, घटनेनंतर आरोपी बेपत्ता आहे. विद्यार्थ्याची हत्या केल्यानंतर त्याने ढालीपूर शक्ती कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्यामुळे, त्या कालव्यात पोलिसांची शोध मोहीम सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











