आधी महिलेवर लैंगिक अत्याचार... नंतर, तिच्यासह पती अन् 2 वर्षांच्या मुलाची निर्दयी हत्या! तिहेरी हत्याकांडाने खळबळ

एका तरुणासह त्याची पत्नी आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून तपासादरम्यान, मृत महिलेवर आधी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

तिहेरी हत्याकांडाने खळबळ

तिहेरी हत्याकांडाने खळबळ

मुंबई तक

• 07:00 AM • 01 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आधी महिलेवर लैंगिक अत्याचार...

point

नंतर, तिच्यासह पती अन् 2 वर्षांच्या मुलाची निर्दयी हत्या!

point

तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Crime news: तमिळनाडूच्या चेन्नई येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणासह त्याची पत्नी आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून तपासादरम्यान, मृत महिलेवर आधी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं आहे. संबंधित महिलेने शारीरिक अत्याचाराला विरोध केला असता तिच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असून तिचा 24 वर्षीय पती श्रीपेरंबदूर परिसरात सिक्योरिटी गार्ड म्हणून नोकरी करत होता. पीडित तरुण त्याच्या कुटुंबासोबत चेन्नईच्या तारामणि परिसरात आपल्या नातेवाईकांच्या जवळ राहत होता. 

महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न 

25 जानेवारीच्या रात्री, बिहारमधील स्थलांतरित कामगार असल्याचा दावा करणारे काही पुरुष त्या तरुणासोबत दारू पित होते. यादरम्यान, आरोपींनी त्या तरुणाच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. त्यावेळी, संबंधित तरुणाने आरोपींना विरोध केला असता त्यांनी पीडित तरुणावर लोखंडी रॉडने वार करण्यात सुरूवात केली आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर, स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात आणि कोणताच साक्षीदार जिवंत राहू नये म्हणून आरोपींनी पीडित महिला आणि तिच्या 2 वर्षांच्या मुलाची देखील निर्घृण हत्या केली. 

हे ही वाचा: रिनोवेशनचे काम सुरु असताना पाऊस आला, मजूर पडीक खोलीत आश्रयाला गेले, अन् दोन वर्ष सडलेला मृतदेह आढळला

कठोर चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्हा कबूल केला... 

26 जानेवारी रोजी चेन्नईच्या पॉश परिसरातील रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह पोत्यात सापडल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. टेक्निकल तपास आणि चौकशीदरम्यान, पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची कठोर चौकशी केली. कठोर चौकशीदरम्यान, आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे. 

आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी बकिंगहॅम कालव्यातून दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. आता, वडील आणि मुलाचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रोयापेट्टाह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच, पीडित महिलेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. या प्रकरणासंदर्भात आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, महिलेचा मृतदेह इंदिरा नगर एमआरटीएस स्टेशनजवळील एका मोठ्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आला होता. आता पोलीस त्या महिलेचा मृतदेह शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली असून राज्यातील कायदा-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

    follow whatsapp