राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणावर शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, म्हणाले 'मी अजितदादांची शपथ...'

मुंबई तक

01 Feb 2026 (अपडेटेड: 02 Feb 2026, 01:36 PM)

Shashikant Shinde : अजित पवार यांच्या निधनाला काही दिवस झाले आणि राज्यातील राजकारणाला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. अजितदादांच्या अंत्यविधीनंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार गटातील नेत्यांनी दादांच्या पक्ष विलीनिकरणावरवरून वक्तव्य केलं.

Shashikant Shinde

Shashikant Shinde

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही'

point

'...कोणताही वेगळा रंग देऊ नये'

Shashikant Shinde : अजित पवार यांच्या निधनाला काही दिवस झाले आणि राज्यातील राजकारणाला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. अजितदादांच्या अंत्यविधीनंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर शरद पवार गटातील नेत्यांनी दादांच्या पक्ष विलीनिकरणावरवरून वक्तव्य केलं. 'आम्ही जी चर्चा केली ती अजितदादांसोबत केली होती. आता ते हयात नाहीत त्यामुळे या गोष्टीचं आम्हाला कसलंही भांडवल करायचं नाही. जेव्हा मी बोललो होतो त्यात त्यांचा कसलाही राजकीय हेतू नव्हता. माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही. मी अजित दादांची शपथ देखील घेतली, ती वस्तुस्थिती आहे,' असे शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी वक्तव्य केलं होतं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : '...नाहीतर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो', 'त्या' विधानाने मोठी खळबळ.. NCP विलिनीकरणावर CM फडणवीस असं का म्हणाले?

'माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही'

'माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही. मी अजित दादांची शपथ देखील घेतली, ती वस्तुस्थिती आहे. अजितदादा प्रचंड भावनिक माणूस होते, जे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करायला हवं होतं. अजितदादा यांच्या बरोबर चर्चा झाली होती की, आमचे काही उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील, हा निर्णय विलीनीकरण होणार म्हणूनत घेतला होता', असं शशिकांत शिंदे म्हणाले होते. 

'...कोणताही वेगळा रंग देऊ नये'

'आम्ही इच्छा व्यक्त केली म्हणजे आम्ही पाठीमागे लागलो आहे, आम्हाला अधिक घाई लागल्याचं चित्र उभं केलं जातंय. आम्ही कुठेतरी हतबल असून दादांची इच्छा म्हणून व्यक्त केलेल्या भावनेला कोणताही वेगळा रंग देऊ नये, जर तसं होत असेल तर हे दुर्दैवी आहे'.  

हे ही वाचा : पार्थ पवार भेटायला आल्यानंतर काय म्हणाले? विलीनीकरणाबाबत चर्चा झाली का? शरद पवारांनी सगळं सांगितलं!

दोन राष्ट्रवादी एकत्र आले असते तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीला मानणारा वर्ग विभागला जात होता तो एकत्र राहिला असता, तसेच निकाल देखील चांगला लागला असता त्याच उद्देशाने दादांनी एकत्र येण्याचा विचार केला असेल', असं शशिकांत शिंदे म्हणाले.