JP Nadda Meets Sonam Wangchuk : केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मेदान्ता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. एक तासाहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत जे. पी. नड्डा यांनी सर्वप्रथम वांगचुक यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या भेटीदरम्यान केंद्र सरकारने शिक्षणविषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांना स्पष्ट केले. तसेच, देशातील शिक्षण पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सरकार योग्य पावले उचलत असल्याचे आश्वासनही यावेळी वांगचुक यांना देण्यात आले.
ADVERTISEMENT
वांगचुक यांना काय विनंती केली?
या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे चार तास प्रदीर्घ चर्चा केली होती. या चर्चेनंतरच केंद्र सरकारने वांगचुक यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. सरकारने सोनम वांगचुक यांना विनंती केली आहे की, त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करावे आणि पुढील आंदोलनात्मक पावले टाळणे टाळावे, जेणेकरून चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवता येतील.
हे ही वाचा : शरद पवारांना आंदोलनस्थळी जाण्यापासून का अडवण्यात आलं?
राहुल गांधींची मागणी काय?
दुसरीकडे, विरोधकांनी छेडलेल्या आंदोलना दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी रिजिजू यांनी राहुल गांधींना स्पष्ट केले होते की, डॉ. जितेंद्र सिंह ज्या मुद्द्यांवर बोलत आहेत, त्या विषयांवर संसदेत चर्चा घेण्यास सरकार पूर्णपणे तयार आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने चर्चेची तयारी दर्शवल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या मागण्यांची दिशा बदलली. त्यांनी संसदेतील चर्चेपेक्षा आधी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
हे ही वाचा : Personal Finance: Home Loan Prepayment खरंच फायदेशीर असते का?
अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी
शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी आपल्या मागण्यांचा परीघ अधिक वाढवत नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. विरोधी पक्षांनी अचानक बदललेल्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरणात नवा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे सरकार सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे विरोधकांच्या या मागणीमुळे संसद आणि रस्त्यावरील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
ADVERTISEMENT












