बीड : शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या

मुंबई तक

27 Sep 2026 (अपडेटेड: 27 Sep 2026, 03:25 PM)

Beed News : बीडच्या दादाहरी वडगाव येथे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Shivsena Leader Suicide Case

Shivsena Leader Suicide Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बीड : शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या

point

टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले?

Beed News : बीडच्या दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली  आहे. शिवाजीराव शिंदे हे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे वाचलं का?

हेही वाचा : पुण्यातील विश्रांतवाडीत 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 52 वर्षीय सफाई कंत्राटी कामगाराला अटक

कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले?

शिवाजीराव शिंदे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या आत्महत्येमागे कोणते कारण होते, याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा : आत्महत्या करू नये म्हणून पोरगा वडिलांना सोडेना, आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत

शिवाजीराव शिंदे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रवाना 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर शिवाजीराव शिंदे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, शिवाजीराव शिंदे यांच्या पार्थिवावर दुपारी अकरा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून तपासानंतरच आत्महत्येमागील कारण स्पष्ट होणार आहे.