'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंची सडकून टीका, विरोधकांना आंदोलनाची हाक!

मुंबई तक

• 11:45 AM • 25 Sep 2026

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्यानेश कुमार आणि भाजपवर त्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!

point

राज ठाकरेंची सडकून टीका

point

विरोधकांना आंदोलनाची हाक!

Raj Thackeray : भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांकडून ग्यानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच काल कॉक्रोच जनता पार्टीनेदेखील कुमारांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर राजीनामा दिला नाही तर पुन्हा एकदा आंदोलन उभं करण्याचा इशारा सीजेपीने दिला आहे.

हे वाचलं का?

अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्यानेश कुमार आणि भाजपवर त्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. या पोस्टमध्ये ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे, जाणून घेऊया.

राज ठाकरे  यांची पोस्ट जशीच्या तशी

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो.

गेले 2 दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी 2025 पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे.

हे ही वाचा : "कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्", राजकीय प्रवेशावर विद्यानंद बापटांची प्रतिक्रिया

एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा.

हे ही वाचा : Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी वरुणराजा बरसणार, मुंबई, पुण्यात काय ?

तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे ! तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल!