पुण्यातील विश्रांतवाडीत 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 52 वर्षीय सफाई कंत्राटी सफाई कामगाराला अटक

मुंबई तक

Pune Crime News : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एका 12 वर्षीय मुलीवर झालेल्या कथितरित्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी एका 52 वर्षीय कंत्राटी सफाई कामगाराला अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप 

point

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एका 12 वर्षीय मुलीवर झालेल्या कथितरित्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी एका 52 वर्षीय कंत्राटी सफाई कामगाराला अटक करण्यात आली. आरोपीची ओळख विश्रांतवाडीतील श्रमिक नगरचा रहिवासी जयसिंग साठे अशी पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडितेती कुटुंबे एकाच परिसरात राहतात, परंतु दोन्ही कुटुंबात कोणतेही नातेसंबंध नाहीत. 

हे ही वाचा : Astrology : पितृपक्षात चार ग्रहांचे भ्रमण, 'हा' दुर्मिळ योग 'या' राशींसाठी फायदेशीर

12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने विश्रांतवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले की, एका 12 वर्षीय मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 12 सप्टेंबर रोजी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत पोलिसांनी आजीचा जबाब नोंदवला. 

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी जयसिंग साठे याला अटक केली आहे. त्यानंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितलं की, तपास मुलीचा जबाब, तक्रारदाराच्या आईचा जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे करण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : विवाहित महिलेचा चुलत भावावर जडला जीव, पण संसार थाटण्याचं स्वप्न जळून खाक!

पोलिसांच्या माहितीनुसार, ही अतिरिक्त कलमे जोडण्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. आरोपी जयसिंग साठे हा पुणे महापालिकेत कंत्राटी सफाई म्हणून कार्यरत होता. पोलीस या प्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई करत आहे. मुलीचा जबाब आणि वैद्यकीय अहवालांनुसार उपलब्ध तथ्यांच्या आधारे पुढील तपास केला आहे.