विवाहित महिलेचा चुलत भावावर जडला जीव, पण संसार थाटण्याचं स्वप्न जळून खाक!

मुंबई तक

आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी एका महिलेने चुलत भावावर दबाव टाकल्यामुळे, त्याने कथितरीत्या तिची गळा आवळून हत्या केली आणि बिजनौरमधील उसाच्या शेतात त्यांचे मृतदेह जाळून टाकले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेचा चुलत भावावर जडला जीव,

point

पण संसार थाटण्याचं स्वप्न जळून खाक!

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या चुलत बहिणीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर ओळख लपवण्यासाठी तिचा मृतदेह उसाच्या शेतात जाळून टाकला. महिलेने आरोपीवर आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्यासोबत राहण्यासाठी दबाव टाकल्याने ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. उसाच्या शेतात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आणि तिच्या शेजारी रडत असलेली तीन वर्षांची जखमी चिमुकली आढळल्यानंतर या भयानक गुन्ह्याला वाचा फुटली. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील ही घटना आहे.

लग्नात भेट भेट अन् प्रेमसंबंध

सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनिल कुमार नावाच्या व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधून मृतदेह आपली पत्नी उषा हिचा असल्याचे ओळखले, तसेच जखमी चिमुकली आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. बिजनौरचे पोलीस अधीक्षक गौतम राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल कुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमात उषा आणि तिच्या काकांचा मुलगा नीरज यांची भेट झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याने उषाने पतीचे घर सोडून चांदपूरमधील सियाऊ शहरात भाड्याच्या घरात राहणे सुरू केले होते.

हे ही वाचा : आत्महत्या करू नये म्हणून पोरगा वडिलांना सोडेना, आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत

घटस्फोट देऊन माझ्यासोबत रहा

तपासादरम्यान नीरजचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. उषा त्याला पत्नीला घटस्फोट देऊन सोबत राहण्यासाठी सतत दबाव टाकत असल्याने त्रस्त होऊन त्याने तिच्या हत्येचा कट रचल्याची कबुली नीरजने दिली. 19 सप्टेंबरला तो उषा आणि तिच्या दोन मुलांना हरिद्वार आणि ऋषिकेशला फिरण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. त्यानंतर 22 सप्टेंबरच्या रात्री त्याने अलमपूर एदवा गावाजवळ गाडीतच उषा आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलीचा गळा आवळला. त्यांना उसाच्या शेतात फेकून अंगावर ब्लँकेट टाकून पेटवून दिले, मात्र या आगीतून तीन वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली.

हे ही वाचा : फडणवीसांच्या निर्णयावर शेतकरी रोखठोक, काय म्हणाले?

असा रचला कट

नीरजने उषाच्या दीड वर्षांच्या प्रियांशू या मुलाला स्वतःसोबत घरी नेले आणि तो बेवारस सापडल्याची खोटी कहाणी घरच्यांना सांगितली, कारण त्याला स्वतःला मुलगा नव्हता आणि त्याला प्रियांशूचा सांभाळ करायचा होता. 23 सप्टेंबरच्या सकाळी उसाच्या शेतात मृतदेह आणि जखमी मुलगी आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमी मुलीला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी नीरजला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी, महिलेचा मोबाईल आणि लहान मुलाच्या दुधाची बाटली जप्त केली आहे.