Astrology : पितृपक्षात चार ग्रहांचे भ्रमण, 'हा' दुर्मिळ योग 'या' राशींसाठी फायदेशीर

Astrology : ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शनी, राहू आणि केतू हे ग्रह आधीपासून वक्रीच्या भ्रमणात आहेत. दरम्यान, 3 ऑक्टोबर रोजी, भौतिक सुखांचा ग्रह मानला जाणारा शुक्र ग्रह देखील आपली गती उलटवून वक्री होणार आहे. अशातच चारही ग्रहांची एकाच वेळी होणारी ही वक्री गती एक मोठी ज्योतिषीय घटना आहे, ज्यामुळे विशेषत: चार राशींसाठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. 

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शनी, राहू आणि केतू हे ग्रह आधीपासून वक्रीच्या भ्रमणात आहेत. दरम्यान, 3 ऑक्टोबर रोजी, भौतिक सुखांचा ग्रह मानला जाणारा शुक्र ग्रह देखील आपली गती उलटवून वक्री होणार आहे. अशातच चारही ग्रहांची एकाच वेळी होणारी ही वक्री गती एक मोठी ज्योतिषीय घटना आहे, ज्यामुळे विशेषत: चार राशींसाठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. 
 

Astrology

2/5

सिंह

शुक्र ग्रहाच्या वक्री गतीमुळे सिंह राशीच्या व्यक्तींची मेहनत अधिक वाढेल. कोणत्याही प्रयत्नात यश मिळवण्यासाठी नेहमीहून अधिक अधिक प्रयत्न करावे लागतील. भावंडांसोबत नात्यात आणि छोट्या प्रवासांमध्ये चढ-उतार येण्याची शक्यता आहे. संभाषण किंवा संवादात घाई करणे टाळावे, कारण यामुळे इतर काही गोष्टी बिघडू नये. 
 

Astrology

3/5

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांचे आर्थिक नियोजन बिघडू शकते. शुक्र वक्री असल्याने अनावश्यक खर्च वाढेल, त्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगा, वैवाहिक आणि प्रेमसंबंधात अनावश्यक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. परराष्ट्र व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. 
 

Astrology

4/5

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी, हा काळ त्यांच्या करिअर आणि नोकरीसाठी अस्थिरता आणू शकतो. कामाच्या ठिकाणी ताण अधिक असेल आणि वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना कोणताही नवीन निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. शुक्र ग्रह जरी आपल्यासाठी अनुकूल असला तरीही त्यांच्या वक्री गतीमुळे कामाच्या ठिकाणी जुने वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.  
 

Astrology

5/5

मीन 

मीन राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित घटना आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागेल. याच काळात कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकले अधिक उत्तम राहणार आहे. सासरच्या मंडळींसोबत संबंधही बिघडू शकतात. कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी प्रत्येक बाबीचे काळजीपूर्वक मूल्यांकन करावे.