"माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न, मी त्यांच्याप्रमाणे पक्ष बदलणार नाही", स्वीडनमधून पुतणीचा विखेंना टोमणा

मुंबई तक

25 Sep 2026 (अपडेटेड: 25 Sep 2026, 03:53 PM)

Nila Vikhe Patil on radhakrishna vikhe patil : स्वीडनच्या संसदेत निवडून आलेल्या निला विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. आपल्या राजकीय यशाचा संबंध विखे कुटुंबाच्या राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Nila Vikhe Patil on radhakrishna vikhe patil

Nila Vikhe Patil on radhakrishna vikhe patil

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

"माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न"

point

"मी त्यांच्याप्रमाणे पक्ष बदलणार नाही", स्वीडनमधून पुतणीचा विखेंना टोमणा

Nila Vikhe Patil on radhakrishna vikhe patil  : नुकत्याच स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या निला विखे पाटील यांनी मंत्री आणि त्यांचे काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवाय, सतत पक्ष बदल्याच्या मुद्द्यावरूनही निला यांनी त्यांना चिमटा काढला. याबाबतचं वृत्त the tribune ने दिलंय.  निला विखे पाटील या राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. 13 सप्टेंबर रोजी झालेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत त्या स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून 349 सदस्यांच्या संसदेत निवडून आल्या. त्या ग्रीन पार्टीच्या सदस्य आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंची सडकून टीका, विरोधकांना आंदोलनाची हाक!

"गेल्या दहा वर्षांत राधाकृष्ण विखे आणि सुजय विखेंशी संपर्क नाही"

माध्यमांशी बोलताना निला यांनी सांगितले की, "सुजय विखे पाटील यांचा एक व्हिडीओ कोणीतरी त्यांना पाठवला होता. या व्हिडीओमध्ये विखे कुटुंबातील एक खासदार महाराष्ट्रात पराभूत झाला असला, तरी कुटुंबातील दुसरा सदस्य स्वीडनमध्ये निवडून आल्याचे सांगितले जात असल्याचे त्यांनी म्हटले. हे आश्चर्यकारक आहे. गेल्या दशकभरात माझा काका किंवा चुलत भावाशी कोणताही संपर्क नाही. मी नियमितपणे भारतात येत आहे. आता माझी खासदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना माझ्या यशाचा आधार घ्यायचा आहे," असे निला यांनी स्पष्ट केले. "त्यांचे (राधाकृष्ण विखे पाटील) राजकारण माझ्यापेक्षा वेगळे आहे. मी माझा पक्ष कधीही बदलणार नाही. त्यांनी बदलला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी नुकताच फोन केला होता. मात्र, गेल्या दहा वर्षांत त्यांच्याशी किंवा सुजय यांच्याशी अन्य कोणताही संपर्क झालेला नाही", असंही निला यांनी नमूद केलं. 

हेही वाचा : दोन मुली एकमेकींच्या प्रेमात आकंठ बुडाल्या, कुटुंबियांना समजताच घडलं भयंकर

निला यांचे चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर मतदारसंघातून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निलेश लंके यांच्याकडून पराभव झाला होता. राधाकृष्ण विखे पाटील हे 2019 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेत काम केले असून काँग्रेसमध्ये असताना कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, काँग्रेसने महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवलेली असताना त्यांनी पक्षाला रामराम केला होता. 

निला यांच्या विजयावर राधाकृष्ण विखे काय म्हणाले होते?

"माझी पुतणी नीला विखे पाटील हिची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून झालेली निवड ही आमच्या संपूर्ण परिवारासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तिने मिळविलेले हे यश तिच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि स्वीडनमधील सार्वजनिक जीवनातील योगदानाची पावती आहे. ला सुरुवातीपासूनच सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय राहिली आहे. स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणूनही तिने जबाबदारी पार पाडली आहे. माझे बंधू अशोक पाटील यांनी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत या यशामागे महत्त्वाचे आहेत. नीला आता स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून तेथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल, याचा मनापासून आनंद आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ", असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. 

निला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला आहे. त्यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्यात एमबीएचे शिक्षण घेतले असून युनिव्हर्सिटी डी कॉम्प्लुटेन्समधूनही शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केले.