अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंच्या वाढदिवशी फडणवीसांची पोस्ट; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण

मुंबई तक

• 11:01 AM • 28 Sep 2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर केलेल्या खास पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. अपक्ष आमदार तांबे आणि फडणवीस यांच्यातील सार्वजनिक संवादाच्या पार्श्वभूमीवर या पोस्टकडे राजकीय वर्तुळातून विविध अर्थांनी पाहिले जात आहे.

devendra fadnavis post satyajeet tambe birthday political connection bjp

मुख्यमंत्री फडणवीसांकडून सत्यजीत तांबेंना शुभेच्छा!

Google CTA

मुंबई: विधानपरिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचा 27 सप्टेंबर रोजी वाढदिवस पार पडला. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, तांबे हे भाजपचे आमदार किंवा महायुतीतील मंत्री नसतानाही मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून केलेली ही पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोशल मीडियाकडे पाहता, महायुतीतील मंत्री आणि आमदारांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा एखाद्या अपक्ष आमदारासाठी केलेली अशी विशेष पोस्ट वेगळी ठरते. त्यामुळे फडणवीसांच्या या शुभेच्छांमागे केवळ औपचारिकता आहे की दोन्ही नेत्यांमधील वेगळ्या राजकीय समीकरणाची ही आणखी एक झलक, याची चर्चा सुरू झाली आहे.

सत्यजीत तांबे यांच्या राजकीय भूमिकेकडेही यामुळे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. पक्षाच्या चौकटीबाहेर राहूनही सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्याकडून मिळणाऱ्या या शुभेच्छा अनेक राजकीय अर्थांनी पाहिल्या जात आहेत.

विशेष म्हणजे, यापूर्वीही मुख्यमंत्री फडणवीस आणि सत्यजीत तांबे यांच्यातील संवाद व सार्वजनिक प्रसंगांमुळे दोन्ही नेत्यांचे संबंध चर्चेत आले आहेत. त्यामुळे यंदाच्या वाढदिवसाच्या पोस्टने त्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे.

अपक्ष आमदाराच्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यांची ही खास पोस्ट नेमकी काय सांगते? राजकारणातील ‘पक्षापलीकडचं कनेक्शन’ पुन्हा चर्चेत येण्यामागे ही पोस्ट कारणीभूत ठरणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.