'पुन्हा फेस आला असेल त्यांना...' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना जोरदार टोला, नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

• 12:29 PM • 22 Jul 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विद्यार्थी आंदोलन फेसलेस असल्याचं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'पुन्हा फेस आला असेल त्यांना...'

point

फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला

point

नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray : जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला काल रात्री भेट दिल्यानंतर शिवसेनाप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी आज (22 जुलै) सकाळी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाला पहिल्या दिवसांपासूनच आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विद्यार्थी आंदोलन फेसलेस असल्याचं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरेंनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

'फेस आला असेल त्यांना'

काल फडणवीस यांनी विद्यार्थी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना हे आंदोलन फेसलेस असल्याचं म्हटलं होतं. त्याविषयी विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, 'फेसलेस म्हणजे पुसून पुसून जरा लेस झाला असेल, म्हणून तेवढ्यापुरता आरशात त्यांना फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना.' पुढं बोलताना ते म्हणाले की, 'सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजकता आणण्याचा आहे का? आणि यांचा बदनामीचा जसा हातखंडा आहे. ते आंदोलनात पाकिस्तानी घुसल्याचं म्हणतात. तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोणी पाकिस्तानी नाहीये ना?'

हे ही वाचा : शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, फोटो व्हायरल

मुलांना आधाराची गरज

पुढं ते म्हणाले की, 'तरुण हे आपल्या देशाचं भविष्य आहेत. भाग्यविधाते ज्यांना म्हणतो आपण त्या भाग्यविधात्यांचं भाग्यच तुम्ही चिरडून टाकणार असाल तर ती लोकं काय ऐकणार नाहीत. आणि ज्यावेळी अशा तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्भत्सना करता ते सहनशीलतेच्या पलीकडे आहे. या मुलांना कोणीतरी आधार देण्याची गरज आहे. आज जर त्यांना आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील. पण या आधारस्तंभाला तोडून-मोडून टाकून हुकूमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाहीत बसणार.'

हे ही वाचा :  मोठी बातमी : जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांनी मध्यरात्रीच घेतली वांगचुक यांची भेट, नेमकं काय घडलं?

बोलण्यात काय कमीपणा?

ठाकरे म्हणाले की, 'जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे असं आपण जर मानत असू, तर तुम्हाला जाऊन त्यांच्याशी बोलण्यात काय कमीपणा वाटतो? असं नाहीये की काल पहिला दिवस होता. दुसऱ्या टप्प्याचा हा विसावा-पंचवीसावा दिवस असेल. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा विसावा-पंचवीसावा दिवस आहे. त्याच्याही आधी अभिजीत आणि सगळी तरुण मंडळी इकडे येऊन गेली होती. त्याच वेळेला यांच्याबरोबर चर्चा केली गेली असती तर हा विषय सुटला असता.'