Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी आंदोलन सुरू केलं. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू असल्याचे सांगण्यात येतं. विरोधकांनी आंदोलन सुरू केल्यानंतर दिल्ली पोलीस त्या ठिकाणी तैनात झाल्याचं पाहायला मिळतय. यावेळी काँग्रेस खासदारांनी ठिय्या आंदोलन करताना आक्रमक घोषणा दिल्या. आमित शहा आपकी गुंडागर्दी नही चलेली, नरेंद्र मोदी गुंडागर्दी नही चलेगी, बंद करो बंद करो तानाशाही बंद करो, अशा घोषणाबाजी केल्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मोदींच्या निवासाबाहेर राहुल गांधींचं आंदोलन, आक्रमक घोषणाबाजी
केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीसह देशातील तरूण आंदोलनात सामील झाले. पेपरफुटी प्रकरणाने देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य मातीमोल होण्याच्या वाटेवर असताना, विद्यार्थ्यांनी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, मात्र अद्याप केंद्र सरकार यावर भ्र शब्द देखील काढताना दिसत नाही. याच सरकारच्या निषेधार्थ आता देशातील तरूण वर्ग एकत्र आला आहे.
आंदोलनातून आक्रमक घोषणाबाजी
परिस्थिती पाहता, आता विरोधी पक्षनेते देखील आक्रमक पावित्रा घेताना दिसत आहेत. राहुल गांधींसह त्यांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासाबाहेर आंदोलन सुरू केलं. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे त्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. ठिय्या आंदोलनात नरेंद्र मोदी गुंडागर्दी नही चलेगी, बंद करो बंद करो तानाशाही बंद करो, अशा घोषणाबाजी केल्या. याचे पडसाद आता देशभर उमटू लागलेले आहेत.
हे ही वाचा : “मविआ आंदोलनात आंतकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय”
देशाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी देखील जंतरमंतर मैदानावर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. अशातच आज रात्री उद्धव ठाकरे देखील आंदोलकांच्या भेटीसाठी जाणार असल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT












