हिंगोली – नांदेड महामार्गावर कामगारांच्या बसला अपघात, १५ जण जखमी

मुंबई तक

• 10:35 AM • 03 Jan 2022

हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ सोमवारी सकाळच्या सुमारास रायपूर (छत्तीसगड) येथून सोलपूरकडे जाणाऱ्या कामगारांच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून एका कामगाराला गंभीर मार लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपूर […]

Mumbaitak
follow google news

हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ सोमवारी सकाळच्या सुमारास रायपूर (छत्तीसगड) येथून सोलपूरकडे जाणाऱ्या कामगारांच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून एका कामगाराला गंभीर मार लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपूर (छत्तीसगड) वरून सुमारे ६० कामगार सोलापूर कडे कामाच्या शोधात खाजगी बसने (क्र.सीजी -०८-एएल- ६०२५) जात होते. हिंगोली-नांदेड महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ पहाटेच्या सुमारास वळण रस्त्यावरून बस पुढे घेत असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन बस उलटली. या अपघातात १५ कामगार जखमी झाले. भल्या पहाटे चालकाला लागलेल्या डुलकीमुळे हा अपघात घडून बस पलटी झाल्याचं कळतंय.

पुणे: रस्तावरुन जाणाऱ्या 12 वर्षाच्या मुलाच्या डोक्यातच घुसली सळई, Video व्हायरल

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्खळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

    follow whatsapp