OBC आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपच, तुमची डाळ शिजणार नाही – यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल

मुंबई तक

• 04:59 AM • 27 Jun 2021

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन भाजपने शनिवारी राज्यात चक्काजाम आंदोलन केलं. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती व राज्यातील प्रत्येक महत्वाच्या शहरांत भाजपने चक्काजाम आंदोलन करत ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारला धारेवर धरलं. महाविकास आघाडी सरकारनेही भाजपच्या या आंदोलनावर टीका केली आहे. भाजपच ओबीसी आरक्षणाचा खरा मारेकरी असल्याची टीका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. […]

Mumbaitak
follow google news

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन भाजपने शनिवारी राज्यात चक्काजाम आंदोलन केलं. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती व राज्यातील प्रत्येक महत्वाच्या शहरांत भाजपने चक्काजाम आंदोलन करत ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारला धारेवर धरलं. महाविकास आघाडी सरकारनेही भाजपच्या या आंदोलनावर टीका केली आहे. भाजपच ओबीसी आरक्षणाचा खरा मारेकरी असल्याची टीका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

हे वाचलं का?

तुम मुझे सत्ता दो मैं तुम्ही आरक्षण दूँगा चा नारा देणाऱ्यांनी केंद्रातील भाजप सरकारकडे जाऊन आरक्षणाची भूमिका मांडावी अशा शब्दांत यशोमती ठाकूरांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं आहे.

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. आमच्या हाती या आरक्षणाची सूत्रं द्या, चार महिन्यात हा प्रश्न सोडवला नाही तर राजकीय संन्यास घेईन असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी चक्काजाम आंदोलनात केलं होतं. सरकार मधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात भांडतात. सत्तेचे लचके तोडतात, मात्र केंद्र सरकार ला दोष देताना एक होतात असाही आरोप फडणवीस यांनी केला. एवढंच नाही तर उद्या यांना यांच्या बायकोने मारले तरीही ते मोदींनाच दोष देतील असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाजपच्या चक्काजाम आंदोलनावर टीका केली आहे. लोकांना रस्त्यावर उतरवून कोरोना घरोघरी पोहचवणं हे नेतृत्वाचं लक्षण नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळलं तोच खरा नेता असतो. नुसती आदळआपटण करायची याला नेतृत्व म्हणता येणार नाही. समोरुन मिळते आहे तरी आदळआपट कर आणि मोडून टाक हे नेतृत्वाचं लक्षण नाही. सरकार तुमच्या मागण्या ऐकत आहे मग संघर्ष कशासाठी? सरकार मागण्या ऐकत नसतं तर मीच तुमच्यासोबत रस्त्यावर उतरलो असतो”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं आहे.

    follow whatsapp