PM Modi Speech: 'पानी और खून एकसाथ नहीं बह सकते..' PM मोदींचं घणाघाती भाषण जसंच्या तसं...

PM Narendra Modi Speech : भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच देशाला संबोधीत केलं. यावेळी नरेंद्र मोदींनी पाकिस्तान आणि दहशतवादावर सडकून टीका केली.

PM Narendra Modi Todays Speech

PM Narendra Modi Todays Speech

मुंबई तक

12 May 2025 (अपडेटेड: 12 May 2025, 09:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर PM मोदींनी पहिल्यांदा देशाला संबोधीत केलं

point

"आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी..."

point

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Narendra Modi Speech : भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच देशाला संबोधीत केलं. यावेळी नरेंद्र मोदींनी पाकिस्तान आणि दहशतवादावर सडकून टीका केली. मोदी आपल्या भाषणात म्हणाले, "22 एप्रिलला दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता, त्यांनी देशाला आणि जगाला धक्का दिला होता. सुट्टी साजरा करणाऱ्या निष्पाप नागरिकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबाच्या समोर, त्यांच्या मुलांसमोर निर्दयीपणे मारणं, हा दहशतवादाचा खूप मोठा बीभत्स चेहरा होता. ती क्रूरता होती. हे देशाच्या सद्भावनेला तोडण्याचा घाणेरडा प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तीकरित्या हे खूप मोठं दु:ख होतं. 

हे वाचलं का?

या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राष्ट्र, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष एका स्वरात दहशतवादाविरोधातील कडक कारवाईविरोधात उभा राहिला होता. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सेनेला पूर्ण सूट दिली. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतवाद्यांच्या संघटनेला माहित झालं आहे की, आमच्या माता-बहिणींच्या कपाळावरून सिंदूर हटवण्याचा परिणाम काय होतो. ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. हे देशातील कोटी कोटी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. पाणी आणि रक्त एकत्रित वाहू शकत नाही, असं मोठं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

"ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य गाठण्यासाठी..." नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

नरेंद्र मोदी पुढए म्हणाले, "आमच्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य गाठण्यासाठी शोर्याचं प्रदर्शन केलं. मी त्यांची वीरता, साहस, त्यांच्या पराक्रमला आज समर्पित करतो. आपल्या देशातील प्रत्येक मातेला, देशातील प्रत्येक बहिणीला आणि देशातील प्रत्येक मुलीला हा पराक्रम समर्पित करतो. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे च्या उशिरा रात्री, 7 मे च्या सकाळी पूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामामध्ये बदलताना पाहिलं आहे. भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानात दहशतवाद्यांची ठिकाणे आणि त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक निशाणा साधला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की भारत एव्हढा मोठा निर्णय घेऊ शकतो. पण जेव्हा देश एकजूट होतो, नेशन फर्स्टच्या भावनेनं भरलेला असतो, राष्ट्र सर्वकाही असतो. तेव्हा फौलादी निर्णय घेतले जातात.

हे ही वाचा >> "पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती

"जेव्हा भारताच्या मिसाईल्सने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला, भारताच्या ड्रोन्सने हल्ला केला, तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतीच नाही, तर त्यांचा नायनाटही झाला. बहावलपूर आणि मुरीदके सारखे दहशतवादी ठिकाणं एकप्रकारे ग्लोबल टेरोरिझमची युनिव्हर्सिटी राहिली आहे. जगात जिथे कुठे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत, मग तो 9/11 असो, लंडन ट्यूब बॉम्बिंग असो किंवा भारतात काही दशकांपासून मोठे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यांचं कनेक्शन कुठे ना कुठे दहशतवादी ठिकाणांवर जोडले गेले होते. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचं सिंदूर पुसलं होतं. म्हणून भारताने दहशतवाद्यांचे हे मुख्यालय उखडून टाकले. भारताच्या हल्ल्यात 100 हून अधिक खुंखार दहशवाद्यांना ठार केलं, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

"पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल्स भारताच्या समोर उद्ध्वस्त झाले..."

दहशतवाद्यांचे अनेक मोठे आका मागील तीस वर्षांपासून पाकिस्तानात खुलेआम फिरत होते. जे भारताच्या विरोधात कट रचत होते. भारताने त्यांना एका झटक्यात संपवलं. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान मोठ्या निराशेत पडला होता. हताश झाला होता. भारताची दहशतवादविरोधी कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला केला. पाकिस्तानने आमच्या शाळा, कॉलेजला, गुरुद्वार, मंदीर, सामान्य नागरिकांच्या घराला निशाणा बनवलं. पाकिस्तानने आमच्या सैन्य ठिकाणांना निशाणा बनवला. पण याच्यातही पाकिस्तान स्वत: उघडा पडला. जगाने पाहिलं की पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल्स भारताच्या समोर उद्ध्वस्त झाली. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने त्यांना आकाशातच उडवून टाकलं, असंही मोदी म्हणाले.

हे ही वाचा >> SSC Result 2025 : 10 वीचा निकाल उद्या, रोल नंबर आताच करून ठेवा डाऊनलोड नाहीतर...

पाकिस्तानने सीमापार कारवाई केली. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला. भारताचे ड्रोन्स आणि मिसाईल्सने योग्य निशाणा साधून हल्ला केला. पाकिस्तानच्या वायूसेनेच्या एअर बेसला उद्ध्वस्त करून टाकलं. यावर पाकिस्तानला खूप घमंड होता. भारताने पहिल्या तीन दिवसातच पाकिस्तानला उद्ध्वस्त करून टाकलं. याचा त्यांना अंदाजही नव्हता. भारताच्या आक्रमक करावाईमुळे पाकिस्तान वाचवण्याचे रस्ते शोधू लागला. पाकिस्तानची धुलाई झाल्यानंतर मजबुरीने 10 मे रोजी दुपारी पाकिस्तानी सेननं आमच्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवाद्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरला मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केलं होतं. दहशतावाद्यांना ठेचून मारलं होतं, असं मोठं विधान मोदींनी केलं.

    follow whatsapp