पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती? जम्मू काश्मीरमधील सांबामध्ये दिसले संशयास्पद ड्रोन, आर्मीने काय म्हटलं?

10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार थांबवण्याचा करार जाहीर केला होता. मात्र, काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला होता. त्यानंतर आता पुन्हा संशयास्पद हालचाली सुरू आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

13 May 2025 (अपडेटेड: 13 May 2025, 08:32 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पाकिस्तानकडून जम्मूमध्ये कुरापती सुरूच?

point

संशयास्पद ड्रोनमुळे वाढली भीती

point

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काय दिसतंय?

Jammu Kashmir Samba Suspected Drone : जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात सोमवारी संशयास्पद ड्रोन दिसल्यानं भारतीय लष्करानं तातडीने कारवाई केली. भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. लष्कराने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं आहे. सध्या कोणतंही शत्रूचं ड्रोन भारतीय हद्दीत नसल्याचं लष्कराने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

सांबामधील संशयास्पद हालचालींचा रिपोर्ट

एएनआयने या न्यूज एजन्सी  शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांबामध्ये पाकिस्तानी ड्रोनवर कारवाई करतानाचे दृश्य दिसले. यामध्ये स्फोटांचा आवाज ऐकू येतोय. यापूर्वी 8 मे रोजी सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा, अमृतसर आणि पठाणकोटमध्येही पाकिस्तानी ड्रोन दिसले होते. 

हे ही वाचा >> Kirana Hills Nuclear Facility: 'भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र केंद्रावर हल्ला केला?', एअर मार्शलांच्या उत्तराने...

भारताने 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात 'ऑपरेशन सिंदूर' केलं होतं. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्यानंतर पाकिस्तानने जम्मू, उधमपूर आणि पठाणकोट येथील भारतीय लष्करी तळांवर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला, परंतु भारताने हे हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले.

 

हे ही वाचा >> "पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती

दरम्यान, 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार थांबवण्याचा करार जाहीर केला होता. मात्र, काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला. श्रीनगरमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले, तसंच रेड अलर्ट जारी करून त्या भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला. राजस्थानच्या पोखरण आणि काश्मीरच्या बारामुल्लामध्ये प्रत्येकी एक ड्रोन पाडण्यात आले. भारतीय लष्कराने नागरिकांना घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगितलं असून, सीमेवरील परिस्थिती सतर्कतेने हाताळली जात आहे.

 



 

    follow whatsapp