सोलापूर : ड्रेनेजमध्ये गुदमरुन ४ कामगारांचा मृत्यू, भाजप आमदाराच्या मुलासह ६ जणांना अटक

काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये ड्रेनेज चेंबरमध्ये अडकून चार कामगारांना श्वास गुदमरल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणात पोलिसांनी अखेर कारवाई करत कामगारांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार कंपनी दास ऑफशोअरचे संचालक व मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे यांचे पुत्र सुजित सुरेश खाडे यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे. २३ डिसेंबरला संध्याकाळी ड्रेनेज लाईन जोडण्यासाठी एक कामगार आतमध्ये उतरला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:59 PM • 04 Jan 2022

follow google news

काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये ड्रेनेज चेंबरमध्ये अडकून चार कामगारांना श्वास गुदमरल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणात पोलिसांनी अखेर कारवाई करत कामगारांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार कंपनी दास ऑफशोअरचे संचालक व मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे यांचे पुत्र सुजित सुरेश खाडे यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

२३ डिसेंबरला संध्याकाळी ड्रेनेज लाईन जोडण्यासाठी एक कामगार आतमध्ये उतरला होता. यादरम्यान गॅसगळतीमुळे तो बेशुद्ध झाला व आतमध्येच पडला. या कामगाराला वाचवण्यासाठी दुसरा कामगार आत गेला आणि तोही आतमध्येच पडला. एकापाठोपाठ सहा जण आत मध्ये पडल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आलं परंतू त्यापैकी ४ कामगारांचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला.

भाजप आमदार सुरेश खाडे यांचा मुलगा सुजीत याच्यासह संतोष दिलीप बडवे, महापालिकेतील कनिष्ठ अभियंता मोहम्मद हनीफ हबीब, अतुल विष्णुपंत भालेराव, व्रज कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक केयूर भरतभाई पांचाल यांना अटक करण्यातत आली आहे.

मनपात भाजपची सत्ता; ठेकाही भाजप आमदाराकडे –

सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. शिवाय सोलापुरात अमृत योजनेतून सुरू असलेले हे काम सांगली जिल्ह्यातील दास ऑफशोअर कंपनीला देण्यात आले आहे. दास ऑफशोअर ही कंपनी मिरजेचे भाजपचे आमदार व माजी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्याशी संबंधित आहे. या कंपनीत आमदार खाडे यांचा मुलगा सुजित हा संचालक आहे. सोलापुरातील ड्रेनेजच्या कामाची जबाबदारी त्याच्याकडे असल्याने ही कारवाई करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा शासकीय कामांच्या ठेकेदारीत होत असलेला राजकीय हस्तक्षेप चर्चेत आला आहे.

मृत्यूप्रकरणी महापालिकेचे अधिकारी, दास कन्स्ट्रक्शन, वज्र कन्स्ट्रक्शन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर भादंवि कलम ३०४ प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्याकडे देण्यात आला होता. सोमवारी चौघांना अटक करून न्यायालयात उभे करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. वाय. सूळ यांच्यासमोर उभे केले असता त्यांना न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली,त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.

    follow whatsapp