आई-वडील जिवंत असेपर्यंत त्यांच्या संपत्तीवर मुलाचा कोणताही अधिकार नाही -मुंबई उच्च न्यायालय

आईवडिलांच्या संपत्तीवर मुलाच्या कायदेशीर हक्काबद्दलच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. जोपर्यंत आईवडिल जिवंत आहेत, तोपर्यंत मुलांचा त्यांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. एका महिलेनं आपल्या पतीची संपत्ती विकण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीअंती न्यायालयाने हा निकाल दिला. याचिकाकर्त्या सोनिया खान यांना त्यांच्या पतीच्या संपत्तीचं कायदेशीर पालकत्व (संपत्तीची मालकी) हवं होतं. त्यांचे […]

Mumbai Tak

विद्या

• 05:19 PM • 19 Mar 2022

follow google news

आईवडिलांच्या संपत्तीवर मुलाच्या कायदेशीर हक्काबद्दलच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. जोपर्यंत आईवडिल जिवंत आहेत, तोपर्यंत मुलांचा त्यांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. एका महिलेनं आपल्या पतीची संपत्ती विकण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीअंती न्यायालयाने हा निकाल दिला.

हे वाचलं का?

याचिकाकर्त्या सोनिया खान यांना त्यांच्या पतीच्या संपत्तीचं कायदेशीर पालकत्व (संपत्तीची मालकी) हवं होतं. त्यांचे पती दीर्घकाळापासून आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, मात्र त्यांचा मुलगा आसिफ खान यांनी याला विरोध केला. वडिलांच्या नावे असलेला फ्लॅट विकण्यास विरोध केला होता. त्यामुळे आईबरोबरच आसिफ खान यांनीही याचिका दाखल केलेली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने आईच्या बाजूने निकाल दिला. यामुळे मुलाला उच्च न्यायालयात झटका बसला आहे. निकाल सुनावण्याच्या काळात न्यायालयाकडून आसिफ खान यांना न्यायालयाकडून काही प्रश्नही विचारण्यात आले.

आसिफ खान यांच्या म्हणण्याप्रमाणे वडिलांच्या संपत्तीचा पालकत्व म्हणजे मालक ते आहेत. आईवडिलांकडे दोन फ्लॅट असून, एक फ्लॅट आईच्या नावे आहे, तर दुसरा वडिलांच्या नावे. त्यामुळे वडिलांच्या नावे असलेल्या फ्लॅटवर आपला अधिकार असल्याचं आसिफ खान यांनी न्यायालयात सांगितलं.

निकाल देताना न्यायालय काय म्हणाले?

आसिफ खान यांच्यावतीने करण्यात आलेला युक्तीवाद न्यायालयाने फेटाळून लावला. वडिलांची काळजी असल्याचं सिद्ध करणारा एकही पुरावा आसिफ खान यांच्याकडून आतापर्यंत सादर करण्यात आलेला नाही, असं न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या खंठपीठाने याचिकेवर निकाल देताना सांगितलं.

आसिफ खान यांनी केलेले सर्व दाव्यांना कोणताही आधार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्याचबरोबर आईवडिल जिवंत असताना मुलं त्यांच्या संपत्तीवर अधिकार सांगू शकतात असं उत्तराधिकार कायद्यात (succession law) कुठेही म्हटलेलं नाही, असंही न्यायालयानं सांगितलं.

आईच्या नावे दुसरा फ्लॅट असून, वडिलांच्या नावे असलेला फ्लॅट विकण्याची गरज नसल्याचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला. त्याचबरोबर आसिफ यांचा स्वभाव दिसून आल्याचंही न्यायालयाने निकाल देताना म्हटलं. दरम्यान, पतीच्या नावे असलेला फ्लॅट विकण्यास परवानगी न्यायालयाने सोनिया खान यांना मोठा दिलासा दिला.

    follow whatsapp