Crime News : एका तरुणाची त्याच्याच बहिणीच्या बॉयफ्रेंडने चाकूने वार करत हत्या केली. या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. स्थानिकांनी धाडस दाखवत घटनास्थळावरून तरुणाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा त्यांनी घटनास्थळावरील मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. ही हादरवून टाकणारी घटना गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस ठाणे परिसरात जुन्या बस स्टँड चौकीसमोरील बाजारपेठेच्या मध्यभागी घडली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पैसा-पाणी: AI तुम्हाला का मिळत आहे मोफत?
मृताच्या बहिणीशी प्रेमसंबंध
संबंधित प्रकरणात एसीपी नंदग्राम प्रियश्री पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव पियूष उर्फ नितीन, कमल सिंग यांचा मुलगा आहे. या प्रकरणात एक वृत्त समोर आले की, शहर कोतवारी परिसरात राहणाऱ्या आरोपी सुनील यादवचे मृताच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. याच मुद्द्याला धरून दोघांमध्ये वादंग उसळला होता.
उपचारादरम्यान भावाचा मृत्यू
शनिवारी सायंकाळच्या सुमारास, उशिराने जुन्या बस स्टँड पोलीस ठाण्यासमोर दोघांमध्ये मोठं वादंग निर्माण झाला. याच वादात सुनीलने पियुषवर अनेक वार केले अशातच आता तो गंभीरपणे जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हे ही वाचा : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भीषण अपघात, नियंत्रण सुटलं अन् दोन्ही भावांवर काळाचा घाला, CCTV फुटेज व्हायरल
संबंधित प्रकरणात एसीपींनी सांगितले की, मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हे देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT











