मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या चहापानाला ऑनलाईन उपस्थिती

मुंबई तक

• 12:26 PM • 21 Dec 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पारंपरिक चहापानाला उपस्थित राहणार नाहीत. ते आज हजर राहणार अशी चर्चा होती. मात्र या कार्यक्रमातही त्यांची ऑनलाईन उपस्थिती असणार आहे असं समजतं आहे. चहापन आणि त्यानंतर होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला त्यांची ऑनलाईन उपस्थिती असणार आहे. स्पॉन्डिलायटिसच्या शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरेंची प्रकृती सुधारते आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान सुरू. […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पारंपरिक चहापानाला उपस्थित राहणार नाहीत. ते आज हजर राहणार अशी चर्चा होती. मात्र या कार्यक्रमातही त्यांची ऑनलाईन उपस्थिती असणार आहे असं समजतं आहे. चहापन आणि त्यानंतर होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला त्यांची ऑनलाईन उपस्थिती असणार आहे. स्पॉन्डिलायटिसच्या शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरेंची प्रकृती सुधारते आहे.

हे वाचलं का?

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान सुरू. तत्पूर्वी अतिथीगृहातील समिती कक्षात चहापानापूर्वी विधिमंडळ सदस्य शेकापचे जयंत पाटील, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारंभी स्वागत केले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मान आणि मणक्यांच्या आजाराचा त्रास त्यांना होत होता. HN रिलायन्स रूग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले होते. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 12 नोव्हेंबरला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुख्यमत्री उद्धव ठाकरे हे 10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर असे 21 दिवस रूग्णालयात होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) HN रिलायंन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आधी वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या सल्ल्यानं विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री आज सत्ताधाऱ्यांच्या पारंपरिक चहापानाला हजर राहणार आहेत अशी चर्चा होती. मात्र आता ते हजर राहणार नाहीत अशी बातमी समोर आली आहे.

    follow whatsapp