मुंबईची खबर: आता मुंबई-पुणे प्रवास सुस्साट... बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक'चं काम लवकरच पूर्ण होणार!

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे मिसिंग लिंकचं काम 2026 च्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करण्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं लक्ष्य असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) मते, प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग केबल-स्टेड पूल, पुढील काही आठवड्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

'मिसिंग लिंक'चं काम लवकरच पूर्ण होणार!

'मिसिंग लिंक'चं काम लवकरच पूर्ण होणार!

मुंबई तक

• 01:44 PM • 03 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आता मुंबई-पुणे प्रवास सुस्साट होणार...

point

बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक'चं काम लवकरच पूर्ण होणार!

Mumbai News: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे मिसिंग लिंकचं काम 2026 च्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करण्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं लक्ष्य असल्याचं सांगितलं जात आहे. MSRDC कडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच केबल स्टे ब्रिजच्या टोकांना जोडण्याचं काम पूर्ण केलं जाणार आहे. आता हे काम मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा एमएसआरडीसीचा अंदाज आहे. अशातच, आता एप्रिल 2026 मध्ये बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक जनतेसाठी उपलब्ध होऊ शकते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) मते, प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग केबल-स्टेड पूल, पुढील काही आठवड्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.  

हे वाचलं का?

वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका 

मिसिंग लिंकचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, मुंबई आणि पुणे यांच्यातील अंतर जवळपास 6 किमीने कमी होईल. यामुळे, प्रवासाचा 25 मिनिटांचा वेळ वाचणार असल्याची माहिती आहे. प्रवाशांना, विशेषतः खालापूर आणि लोणावळा दरम्यानच्या भागात, स्थानिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका मिळेल. या प्रकल्पाअंतर्गत, खालापूर टोल नाक्यापासून खोपोली एक्झिटपर्यंत एक्सप्रेस वे सहा पदरी वरून आठ पदरी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, खोपोली ते कुसगाव पर्यंत 13.3 किलोमीटरचा एक नवीन अलाइनमेंट बांधण्यात येत आहे. यामध्ये, दोन लांब बोगदे आणि दोन मोठ्या पुलांचा समावेश आहे. 

हे ही वाचा: Govt Job: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी हवीये? PGIMER कडून बंपर भरती... 10 वी पास उमेदवारांना सुद्धा संधी

प्रवाशांचा किमान 25 मिनिटांचा वेळ वाचेल 

1 एप्रिल 2002 ला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेची सुरूवात झाली होती. 24 वर्षांनंतर, या एक्सप्रेसवेमुळे मुंबई आणि पुणे दरम्यान वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करणे शक्य होईल. इतकेच नव्हे तर प्रवाशांचा किमान 25 मिनिटांचा वेळही वाचणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय, घाट विभागात होणारे अपघात टाळले जाणार असून वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याची माहिती आहे. 

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 13.3 किमी लांबीच्या 'मिसिंग लिंक'चं बांधकाम पूर्ण होण्याची जनतेला प्रतिक्षा आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या 6,595 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला कोविड-19 साथीच्या आजारामुळे आणि पावसाळ्यामुळे अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे.

    follow whatsapp