आता जेवणाच्या ताटात येणार पिवळा, जांभळा फ्लॉवर..

आजपर्यंत आपण पांढऱ्या रंगाचा फ्लॉवर पाहिलाय आणि खाल्लाही आहे पण आता जर तुमच्या जेवणाच्या ताटात रंगीत फ्लॉवर आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आपल्या महाराष्ट्रातल्याच एका प्रयोगशील शेतक-याने रंगीत फ्लावरच्या उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केलाय. त्यामुळे सिमला मिर्ची प्रमाणे आता आपल्याला फ्लॉवरमध्येही तीन रंगांचे ऑप्शन्स मिळणारेत. मालेगाव तालुक्यातील दाभाडीत महेंद्र निकम या प्रयोगशील शेतक-याने हा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:11 PM • 09 Feb 2021

follow google news

आजपर्यंत आपण पांढऱ्या रंगाचा फ्लॉवर पाहिलाय आणि खाल्लाही आहे पण आता जर तुमच्या जेवणाच्या ताटात रंगीत फ्लॉवर आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आपल्या महाराष्ट्रातल्याच एका प्रयोगशील शेतक-याने रंगीत फ्लावरच्या उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केलाय. त्यामुळे सिमला मिर्ची प्रमाणे आता आपल्याला फ्लॉवरमध्येही तीन रंगांचे ऑप्शन्स मिळणारेत.

हे वाचलं का?

मालेगाव तालुक्यातील दाभाडीत महेंद्र निकम या प्रयोगशील शेतक-याने हा प्रयोग केलाय. त्यांनी पिवळ्या व जांभळा रंगाच्या फ्लॉवरचं यशस्वी उत्पादन घेतलंय. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा हा प्रयोग राज्यातला पहिला असा प्रयोग असल्याने खुद्द कृषिमंत्री दादा भुसे यांनीही निकम यांच्या शेताला भेट देवून या रंगीत फ्लॉवरची पाहणी केलीय. दादा भुसेंनी निकम यांचं कौतुक करून अशा प्रयोगाची गरज असल्याचंही म्हंटलंय.

दाभाड़ी महेंद्र निकम यांचीही प्रयोगशील शेतकरी म्हणून ख्याती आहे. त्यांची वडिलोपार्जित शेत जमीन असून त्यांनी आपल्या शेतात शेवगा, पपई, सिमला मिरची, ब्रोकोली या सारख्या पिकांचे प्रयोग केले आहे. पण आता महेंद्र निकम यांनी थोड़ी वेगळी वाट निवडत आपल्या 30 गूंठे शेतात रंगबेरंगी फ्लॉवरची प्रायोगिक तत्वावर उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांनी पहिल्या टप्प्यात पिवळ्या, जांभळा वाणाची निवड केलीय आणि यशस्वी सुद्धा करून दाखवलीय.

रंगबेरंगी फ्लॉवरच्या उत्पादनातून निकम यांना चांगले पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. या रंगबेरंगी फ्लॉवरची परिसरात जोरदार चर्चा असून परिसरातील शेतकरी निकम यांच्या शेताला भेट देवून कुतूहलाने पाहणी करीत आहेत. त्यामुळे बड्या शहरांमध्ये, मोठमोठ मॉलमध्ये या रंगबेरंगी फ्लॉवर ता मोठी मागणी मिळेल अशी त्यांना आशा आहे.

    follow whatsapp