Zapuk Zupuk Teaser: 'झापुक झुपूक'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, सूरज चव्हाणचा 'तो' सीन पाहून डोळे पाणावतील!

Zapuk Zupuk Movie Teaser Video : सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेडी करून अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेला सूरज चव्हाण आता बॉक्स ऑफिसवर गाजवणार आहे.

Zapuk Zupuk Movie Teaser

Zapuk Zupuk Movie Teaser

मुंबई तक

19 Mar 2025 (अपडेटेड: 19 Mar 2025, 05:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सूरज चव्हाण मोठ्या पडद्यावर झळकणार!

point

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली होती मोठी घोषणा

point

'झापुक झुपूक'चा धमाकेदार टीझर एकदा पाहाच

Zapuk Zupuk Movie Teaser Video : सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेडी करून अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेला सूरज चव्हाण आता बॉक्स ऑफिसवर गाजवणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीजनमध्ये विजेता ठरलेला सूरज आता महाराष्ट्रातील घरांघरात पोहोचला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लाखो चाहत्यांच्या प्रेमामुळे सूरजने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्याचवेळी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजला सिनेमात झळकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे सूरज चव्हाण म्हणजे सर्वांचा 'गुलिगत किंग' 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांचा मनोरंजन करताना दिसणार आहे. 

हे वाचलं का?

'झापुक झुपूक' हा सूरज चव्हाणचा फेमस डायलॉग..सूरज स्टेजवर असो किंवा एखाद्या रीलच्या शुटिंगमध्ये, झापूक झुपूक डायलॉग बोलून सूरज नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्यामुळेच सूरज चव्हाण त्याच्या फेव्हरेट म्हणजेच 'झापुक झुपूक' या सिनेमात दिसणार आहे. जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे प्रोडक्शनने झापुक झुपूक सिनेमाची निर्मिती केली आहे.

या सिनेमाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनीही सोशल मीडियावर या टीझरला पसंती दर्शवली आहे.  
“मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे", हा डायलॉग बोलून सूरजने या सिनेमाच्या टीझरमध्येच धमाका केल्याचं पाहायला मिळत आहे. झापुक झुपूक सिनेमाच्या या धमाकेदार टीझरमध्ये जबरदस्त अभिनय करण्यासोबतच भन्नाट डायलॉगबाजी केली आहे.

हे ही वाचा >> Nagpur Violence : "हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग", FIR मध्ये काय म्हटलंय?"

...म्हणून सूरज चव्हाण प्रकाशझोतात आला

सूरज चव्हाण लोकप्रिय इन्फ्ल्यूएन्सर आहे. सूरज इन्स्टाग्रामवर कॉमेडी कंटेन्ट शेअर करून तमाम चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. तसच जबरदस्त अभिनय करून सूरज इन्स्टाग्रामवर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतो. बारामतीच्या मोधावे गावात सूरजचा जन्म झाला. सूरजने वैयक्तीक जीवनात अनेक संघर्ष पाहिला आहे. सूरजच्या वडिलांचं कर्करोगामुळे निधन झालं होतं. पण सर्वात धक्कादायक म्हणजे त्याच दिवशी त्याच्या आईचं आणि आजीचं निधन झालं. त्यामुळे तरुणपणीच सूरज अनाथ झाला होता. त्यानंतर सूरज आणि त्याच्या पाच बहिणींनी खूप मेहनत घेतली. 

हे ही वाचा >> Nagpur Violence Mastermind: निवडणूक लढवणारा 'हा' नेताच निघाला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, फोटोही आला समोर..

सूरज सर्वात पहिले सोशल मीडियावर प्रकाशझोतात आला. कारण सूरजने त्याच्या भन्नाट स्टाईल आणि कॉमेडी व्हिडीओजमुळे लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'गुलिगत' आणि 'बुक्कीत टेंगूळ', असे त्याचे फेमस डायलॉग आहेत. सोशल मीडियाच्या दुनियेत लोकप्रिय झाल्यानंतर सूरजने मराठी चित्रपटातही काम केलं.  राजा राणी आणि मुसंडी यामध्ये सूरजना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

    follow whatsapp