Nagpur Violence Mastermind: निवडणूक लढवणारा 'हा' नेताच निघाला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, फोटोही आला समोर..
Nagpur Violence Mastermind Name: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड कोण आहे हे आता समोर आलं आहे. मुख्य आरोपी म्हणून या मास्टरमाइंडचं नाव FIR मध्ये देखील टाकण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

Mastermind of Nagpur Violence: नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी (17 मार्च) झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड नेमका कोण हे अखेर आता समोर आलं आहे. या दंगलीचा सूत्रधार फहीम शमीम खान नावाचा माणूस असल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. त्यानेच लोकांना भडकावले आणि गर्दी जमवली. ज्यानंतर नागपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला.
नागपूर पोलिसांचा दावा आहे की, 38 वर्षीय फहीम शमीम खान याच्या भाषणानंतरच नागपुरात हिंसाचार उसळला. त्याच्यावर समुदायाला भडकवण्यासाठी प्रक्षोभक भाषणे दिल्याचा आरोप आहे. तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDp) चा नागपूर अध्यक्ष आहे.

निवडणूक लढवणाराच निघाला हिंसाचाराचा मास्टरमाईंड
फहीम शमीम खान याने 2024 ची निवडणूक नागपूर लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. 2024 च्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्याने भाजप नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवली होती. दरम्यान, हाच फहीम खान हा नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याने आता समोर आले असून त्याचे नाव देखील FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा>> Nagpur Violence : "हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग", FIR मध्ये काय म्हटलंय?"
नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी झालेलं आंदोलन आणि त्यानंतर झालेल्या वादाने सोमवारी अचानक हिंसक वळण घेतलं. नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर मोठ्या हिंसाचार उसळला.










