Nagpur Violence : "दूध आणायला गेलेला मुलगा व्हेंटीलेटरवर, रेल्वे पकडायला निघालेला भाऊ ऑक्सिजनवर"

मुंबई तक

Nagpur Violence : मोमीनपुऱ्याजवळील गार्ड लाइन इथे राहणाऱ्या रझा युनूस खान या मुलाला रात्री साडेदहाच्या सुमारास त्याच्या आईनं सकाळच्या सेहरीसाठी दूध आणि दही आणायला पाठवलं होतं. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना IGGMCH रुग्णालयातून फोन आला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर हिंसाचारतील जखमींच्या करूण कहाण्या

point

कामासाठी घराबाहेर पडले, पण थेट दवाखान्यात सापडले

Nagpur Violence : औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी करत सोमवारी राज्यभर आंदोलनं झाली. त्यानंतर नागपूरमध्ये संध्याकाळी हिंसाचार उसळला. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या सर्व हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांच्या, कुटुंबाच्या हृदयद्रावक कहाण्या समोर आल्या आहेत. कारण कामासाठी बाहेर पडलेले लोकही या हिंसाचाराचे बळी ठरलेत. या जखमी ओल्या असतानाच आता कुटुंबीयांना पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. 

ट्रेन पकडण्यासाठी निघालेले इरफान अन्सारी ऑक्सिजनवर...

बडे नवाज नगर येथील रहिवासी असलेला इम्रान अन्सारी मोठ्या भावासोबत झालेल्या घटनेनं हादरले आहेत. व्यवसायाने वेल्डर असलेला इरफान सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घरातून बाहेर पडला. तो नागपूर रेल्वे स्थानकावरून इटारसीला जाणारी पहाटे 1 ची ट्रेन पकडणार होता. मात्र तो ट्रेन पकडू शकला नाही. हिंसाचारात तो जखमी झाला. आपला मोठा भाऊ इरफान अन्सारी याच्या गंभीर प्रकृतीमुळे इम्रान आणि कुटुंब हादरलं आहे.

हे ही वाचा >> Pune Bus Fire : चालती बस पेटली, सिमेंट ब्लॉकला धडली, 4 जणांचा होरपळून मृत्यू, भयावह दृश्य समोर

या कुटुंबाला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाकडून (IGGMCH) फोन आला. इरफानला जखमी अवस्थेत इथे दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. इम्रानने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, माझ्या भावाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पायाला फ्रॅक्चर झालं आहे. सध्या त्याला आयसीयूमध्ये भरती केलं असून, ऑक्सिजनवर आहे.

मात्र, कुटुंबाचं लक्ष सध्या इरफान यांच्यावर उपचावर असल्यानं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अजून तक्रार दाखल करता आलेली नाही. स्टेशनला जाताना नेमकं काय घडलं, इरफान कसा जखमी झाला? याबाबत घरच्यांना काहीच माहिती नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp