मुख्यमंत्र्यांचं विचित्र कृत्य, भर कार्यक्रमात नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाबच खेचला अन्…

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात एका मुस्लिम डॉक्टर महिलेचा हिजाब खेचल्याचा video समोर आला आहे.

Mumbai Tak

Bihar Cm Nitish kumar On Hijab

मुंबई तक

• 06:11 AM • 16 Dec 2025

follow google news
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नितीश कुमार यांनी एका डॉक्टर मुस्लिम महिलेसोबत अत्यंत विचित्र कृत्या केल्याचे पाहायला मिळत आहे. Video मध्ये नितीश कुमार हे डॉक्टर महिलेला नियुक्तीपत्र देताना तिच्या चेहऱ्यावरील हिजाब (नकाब) खेचताना दिसत आहेत. 

ही घटना पाटण्यातील मुख्यमंत्री सचिवालयातील 'संवाद' इमारतीत आयोजित नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात घडली. या कार्यक्रमात आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्यात येत होते, त्यापैकी काहींना मुख्यमंत्री स्वतः पत्र देत होते.

हे वाचलं का?

व्हिडिओनुसार, महिला डॉक्टर नुसरत परवीन (किंवा नुसरत प्रवीण) नियुक्तीपत्र घेण्यासाठी मंचावर आल्या. त्या हिजाब घालून होत्या. नीतीश कुमार यांनी त्यांना पत्र दिल्यानंतर "हे काय लावलंय?" असा प्रश्न विचारला आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता स्वतः हिजाब खेचून खाली केला. यावेळी मंचावर उपस्थित काही अधिकारी हसताना दिसले, तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नीतीश कुमार यांना रोखण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टर काही क्षण अस्वस्थ दिसल्या.

https://x.com/rjdforindia/status/2000524616217837735?s=46&t=2Lmc4aZiGvF4_o0tppvpBQ

या घटनेने बिहारच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षांनी, विशेषतः राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेसने नीतीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

आरजेडीचा हल्लाबोल

आरजेडीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर करत म्हटलं आहे, "नीतीश जींना काय झालंय? त्यांची मानसिक स्थिती आता पूर्णपणे दयनीय झाली आहे की नीतीश बाबू आता १००% संघी झाले आहेत?" पक्षाच्या प्रवक्त्या एजाज अहमद यांनी म्हटलं की, मुस्लिम महिलेचा हिजाब काढणं हा महिलांच्या सम्मानाविरोधी कृत्य आहे आणि एनडीए सरकारची मुस्लिम समुदायाविषयीची वृत्ती दाखवते. 

दुसरे नेते मृत्यूंजय तिवारी यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री सतत महिलांचा अपमान करत आहेत आणि आता ते बिहार चालवण्याच्या स्थितीत नाहीत.

काँग्रेसची प्रतिक्रिया

काँग्रेसनेही व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, "हे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आहेत. त्यांची बेशर्मी पाहा – एका महिला डॉक्टर नियुक्तीपत्र घेण्यासाठी आलेली असताना नीतीश कुमार यांनी तिचा हिजाब खेचला. राज्यातील सर्वोच्च पदावर बसलेला माणूस सार्वजनिक व्यासपीठावर अशी कृत्य करतोय. यावरून राज्यात महिलांची सुरक्षा किती आहे याचा अंदाज बांधा." काँग्रेसने या घटनेसाठी नीतीश कुमार यांचा त्वरित राजीनामा मागितला आहे.

या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा, अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा आणि मुख्यमंत्रींच्या वर्तनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नीतीश कुमार यांच्या पक्षाने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण जद(यू)च्या एका नेत्याने म्हटलं आहे की, नीतीश कुमार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि अल्पसंख्याक कल्याणासाठी खूप काम केलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला असून, बिहारच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडलं आहे विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सत्ताधारी एनडीएवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहेत.

    follow whatsapp