महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे तिकडे राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा झाली होती. या लॉकडाउनमध्ये काही भागांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने जनतेला काही प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत.
ADVERTISEMENT
निर्बंध शिथील करत असताना राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातही रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
१ जून पासून औरंगाबादमध्ये या नियमांमध्ये झालाय बदल –
१) अत्यावश्यक सेवेतील दुकानं आता सर्व दिवस सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेपर्यंत सुरु राहतील.
२) अत्यावश्यक सेवेत न येणारी दुकानं सोमवार ते शुक्रवार या वेळेत सकाळी ७ ते दोन या वेळेत सुरु राहतील. शॉपिंग सेंटर आणि मॉल मात्र बंदच राहतील.
३) महानगरपालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातील बँका Working Days मध्ये पूर्ण वेळ सुरु राहतील.
४) रेस्टॉरंट, हॉटेल, बार, मद्यविक्री ही दुकानं पार्सल आणि घरपोच विक्रीसाठी सुरु राहतील.
५) ई-कॉमर्स सेवेच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेत येणारी आणि अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या वस्तू पोहचवण्याची मूभा देण्यात आली आहे.
६) दुपारी तीन वाजल्यानंतर वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवेचं कारण वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.
७) शासकीय आणि निम-शासकीय कार्यालायं २५ टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.
८) कृषी सेवेशी संबंधित सर्व दुकानं सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील.
९) मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध लागू नसतील.
ADVERTISEMENT
