Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांमध्ये आईवरून शिवीगाळ केल्यावरून वाद झाला. यानंतर दोघांमधील वाद आणखी वाढत गेला आणि याच वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. तेव्हा दुसऱ्या तरुणाचे दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना सोमाटणे फाट्याजवळील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील एका मैदानावर 5 फेब्रुवारी सायंकाळी 5.30 ते 6 वाजता घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अजित पवारांच्या निधनापूर्वीचा शेवटचा Video आला समोर, कोणी समोर आणला तो व्हिडिओ?
क्रिकेटचा सामना बघण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये वाद
मृत तरुणाचे नाव संतोष पवार आणि आरोपीचे नाव सनी चव्हाण असे होते. क्रिकेटचा सामना बघण्यासाठी दोघेही एकाच ठिकाणी बसले होते, त्याचदरम्यान काही कारणावरून दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता.
आईवरून शिवीगाळ अन् दगडाने ठेचून ठार मारलं
याच वादातून संतोष पवारने सनी चव्हाणला आईवरून शिवीगाळ केली. याच कारणाने सनी संतापला आणि रागाच्या भरात त्याने संतोषच्या डोक्यात दगडाने हल्ला करत ठेचून ठार मारलं. या हल्ल्यात संतोषचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा थरार पाहून घटनास्थळावरील लोक पळू लागले होते.
हे ही वाचा : कोणत्याही न्यायात सहानुभूतीचं कार्ड चालत नाही, पार्थ पवार जमीन घोटाळ्यातून सुटणं शक्यच नाही, अंजली दमानिया आक्रमक
संबंधित घटनेची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. काही वेळातच पोलिसांनी आरोपी सनी चव्हाणच्या मुसक्या आवळल्या. शिवीगाळ करण्यातूनच हे प्रकरण घडल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT











