क्रिकेट खेळतानाच तो मैदानावर कोसळला…

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात क्रिकेटचा सामना रंगला असतानाच क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जाधववाडी गावात स्वर्गीय मयूर चषक स्पर्धेच्या क्रिकेट सामन्यात ही धक्कादायक घटना कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेत मृत्यमुखी पडलेल्या 47 वर्षीय इसमाचे नाव बाबू नलावडे असुन ते परिसरातले नामवंत खेळाडू होते. जुन्नरच्या जाधववाडी येथे मयुर चषक […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:38 PM • 18 Feb 2021

follow google news

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात क्रिकेटचा सामना रंगला असतानाच क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जाधववाडी गावात स्वर्गीय मयूर चषक स्पर्धेच्या क्रिकेट सामन्यात ही धक्कादायक घटना कॅमेरात कैद झाली आहे.

हे वाचलं का?

या घटनेत मृत्यमुखी पडलेल्या 47 वर्षीय इसमाचे नाव बाबू नलावडे असुन ते परिसरातले नामवंत खेळाडू होते. जुन्नरच्या जाधववाडी येथे मयुर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असताना ओझर संघ व जांबुत संघ यांच्यात टेनिस बॉल क्रिकेट सामना चालू होता.

या सामन्यात बाबू नलावडे यांना फलंदाजी करत असतानाच अचानकपणे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते खाली बसले आणि हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो मैदानावरच कोसळला.

पुढच्या काही मिनीटातच इतर खेळाडूंनी बाबु नलावडे यांना नारायणगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवले, पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

या घटनेचा टेनिस क्रिकेट विश्वाला अतिशय जबर धक्का बसला आहे एखाद्या खेळाडूंचे असे मैदानावर दुःखद निधन झाल्या यामुळे तालुक्यात व क्रिकेटप्रेमींमधून हळहळ व्यक्त केली आहे.

    follow whatsapp